मराठी मालिकाविश्वात २७ मेला दोन नव्या मालिका दाखल झाल्या. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका सुरू झाली. या मालिकेत अभिनेता विशाल निकम, पूजा बिरारी आणि जय दुधाणे प्रमुख भूमिकेत आहेत. तर ‘कलर्स मराठी’वर ‘अबीर गुलाल’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार, पायल जाधव आणि अक्षय केळकर प्रमुख भूमिकेत झळकले. पण या दोन्ही मालिकांना पहिल्याच आठवड्यात किती टीआरपी मिळाला? कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे? जाणून घ्या…

मागील आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या टीआरपी रिपोर्टनुसार विशाल निकम, पूजा बिरारी व जय दुधाणे यांच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेने टीआरपीमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांना मागे टाकत ही मालिका टॉप-५मध्ये आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका ‘साधी माणसं’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘अबोली’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘शुभविवाह’ या ‘स्टार’च्या लोकप्रिय मालिकांवर वरचढ होतं टीआरपीच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेला ५.८ रेटिंग मिळालं आहे.

हेही वाचा- “हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं…”, प्रियदर्शनी इंदलकरचा सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारने गौरव, पोस्ट करत म्हणाली…

तसंच ‘कलर्स मराठी’च्या ‘अबीर गुलाल’ मालिका टीआरपीच्या यादीत २९व्या स्थानावर आहे. गायत्री दातार, पायल जाधव आणि अक्षय केळकरच्या या मालिकेला १.१ रेटिंग मिळालं आहे.

दरम्यान, २७ मेपासून सुरू झालेल्या ‘येड लागलं प्रेमाचं’ व ‘अबीर गुलाल’ या मालिकेमुळे एका जुन्या मालिकेची वेळ बदलण्यात आली तर दुसऱ्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेमुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ची वेळ बदलण्यात आली. तसंच ‘अबीर गुलाल’ मालिकेमुळे ‘काव्यांजली’ ऑफ एअर झाली. ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेचा वेळ बदलण्यात आल्यामुळे टीआरपीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. ११ वाजता या नव्या वेळेत प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरलेला पाहायला मिळत आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट असलेली मालिका आता १३व्या स्थानावर आली असून ३.० रेटिंग मिळालं आहे.

हेही वाचा – लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे ‘या’ देशात गेले फिरायला, पाहा फोटो

टॉप-५ मालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१) ठरलं तर मग
२) लक्ष्मीच्या पाऊलांनी
३) प्रेमाची गोष्ट
४) तुझेच मी गीत गात आहे
५) येड लागलं प्रेमाचं