बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. चित्रपटात दुय्यमी भूमिका करण्यापासून ते हिरोच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास त्याच्या चाहत्यांनी बघितला आहे. नुकताच त्याचा स्त्रीवेषातील लूक चर्चेत आला आहे. ‘हड्डी’ असे चित्रपटाचे नाव असून, मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यातून चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माहिती मिळाली. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

नवाझने आजवर भूमिका केल्या आहेत. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता. जरी आज नवाझ प्रसिद्ध झाला असला तरी त्याच्यासोबत एक सीन करण्यासाठी अभिनेत्री तयार नव्हती. नवाझ ‘रमण राघव’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या कार्यक्रमात गेला होता. तिथे त्याने धमाल उडवून दिली होती. कपिलने कार्यक्रमा दरम्यान त्याला प्रश्न विचारले, कपिल म्हणाला, ‘कधी बँक लुटणे, खून करणे, शिव्या देणे अशा भूमिका स्वतःहून करतोस की तुला विचारल्या जातात, त्यावर नवाजने उत्तर दिले की नुकताच एक चित्रपट करत होतो ज्यात मला अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करायचा होता मात्र त्या अभिनेत्रीला जेव्हा हे समजले तेव्हा ती पळून गेली. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

‘रक्ताने माखलेले हात, धारधार शस्त्र… ‘ स्त्री वेषातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

कपिलने पुढे विचारले की, ‘एखाद्या निर्मात्याने तुला हवे तितके पैसे दिले आणि हवी ती भूमिका करण्यास सांगितले तर तुला कोणती भूमिका करायला आवडेल’? त्यावर नवाजने लगेचच उत्तर दिले होते, ‘अर्थात मला रोमँटिक भूमिका करायला आवडेल. हे ऐकल्यानंतरदेखील प्रेक्षक पुन्हा एकदा खळखळून हसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रमण राघव’ हा चित्रपट २०१६ प्रदर्शित झाला होता. नवाजच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केले होते. अनुराग कश्यप या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. तर विकी कौशल, अमृता सुभाष, अशोक लोखंडे, विपीन शर्मा अशा कलाकारांनी यात काम केले होते. मुंबईमधील रमण राघव या विकृत गुन्हेगाऱ्यावर हा चित्रपट बेतला होता.