19 October 2019

News Flash

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक

विविध कामांनिमित्त रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : विविध कामांनिमित्त रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप धिमा मार्ग, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर माहिम ते गोरेगावदरम्यान ब्लॉक होणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील उपनगरी रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – कल्याण ते ठाणे अप धिमा मार्ग

कधी – स. ११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम – ब्लॉकमुळे धिम्या व अर्धजलद उपनगरी रेल्वे कल्याण ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांत अप धिम्या उपनगरी रेल्वे थांबणार नाहीत.

हार्बर मार्ग

कुठे – वाशी ते पनवेल

कधी – स. ११.३० ते ४.००

परिणाम – सीएसएमटी ते बेलापूर, पनवेल दोन्ही मार्गावर आणि पनवेल, बेलापूर ते ठाणे अप मार्ग तसेच पनवेल ते अंधेरीदरम्यानच्या उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – माहिम ते गोरेगाव हार्बर दोन्ही मार्ग

कधी – स. ११ ते सायं ४

परिणाम – या ब्लॉकमुळे हार्बरवरील सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगावदरम्यानच्या उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द होतानाच चर्चगेट ते गोरेगाव धिम्या उपनगरी रेल्वे फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

First Published on September 14, 2019 1:05 am

Web Title: railway announce mega block on all three route on sunday zws 70