scorecardresearch

चंद्रपूर : विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू

या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले, शवविच्छेदन करून घटनास्थळीच जाळून टाकले.

Death female leopard chandrapur district
चंद्रपूर : विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : नागभीड वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मासली बिटच्या शेत संकुलातील विहिरीत पडून सुमारे दीड वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा – मोदी, भाजपाने संघाला गुंडाळले! काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – देशासाठी धावण्याचा ध्यास : ‘देव’ धावतो दररोज २५ किमी; ‘अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये विक्रम करण्याचे ध्येय

पानोली येथील रहिवासी भैय्याजी मानकर यांच्या शेतात असलेल्या सायगाता रोडला लागून असलेल्या विहिरीत ४ दिवसांपूर्वी मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आज सकाळी वरील घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले, शवविच्छेदन करून घटनास्थळीच जाळून टाकले. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित होते. पशू विकास अधिकारी ममता वानखेडे यांनी शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाठलाग करत असताना मादी बिबट विहिरीत पडली आणि पाण्यात बुडाली. यावेळी ढेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 16:22 IST

संबंधित बातम्या