नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने समाजमाध्यमांवर ‘फेक पोस्ट’ प्रसारित करण्यात आली असून त्यामध्ये एका विशिष्ट जाती-धर्माबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. याबाबत गडकरी यांच्या कार्यालयाकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दत्तात्रय जोशी नावाच्या अकाऊंटवरून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नावे काही आक्षेपार्ह मजकूर अनेक ‘व्हॉट्सॲप ग्रुप’वर पसरवण्यात आला. त्यात विशिष्ट जाती-धर्माविषयी लिहिण्यात आले होते. त्या ‘पोस्ट’मुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. हा खोडसाळ प्रकार केल्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> “राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी यांच्या ट्वीटरवरून माहिती देऊन सदर बनावट ‘पोस्ट’ करणाऱ्याविरुद्ध नागपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ‘पोस्ट’ प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. गडकरींच्या नावाची बदनामी करणारा मजकूर समाजमाध्यमांवर पसरवणाऱ्याविरुद्ध तक्रार आली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांनी दिली.