गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील चिचगड कडून भरधाव वेगात येणाऱ्या अनियंत्रित कार ने रस्त्यालगत असलेल्या बीजाच्या झाडाला जोरात धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी ०१ जुलै रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील परसटोला शिवारात घडली.राजा भारती (अंदाजे वय ३५), सोहेल शेख (अंदाजे ३२ वय) असे या अपघातातील मृतकाचे नाव आहे. तर सलमान शेख (अंदाजे २५ वय) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या अपघातात कार ची धडक इतकी जबर होती की कार चा पूर्ण चक्काचूर झाली. पहाटेची घटना असल्यामुळे तीन तासानंतर मृतक व जखमींना कार मधून बाहेर काढण्यात आले. देवरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवरी शहरातील तीन तरूण कार क्रमांक (सी.जी. ०८ आर ६२५५) ने देवरी चिचगड मार्गावरून देवरी कडे येत असताना परसटोला शिवारातील वन विभागाच्या नाक्याजवळ चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि रस्त्यालगत असलेल्या बीजाच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात कार चालक व चालकाच्या शेजारच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला. मृत व जखमी देवरीचेच रहिवाशी आहे. अपघातात सलमान शेख या तरूणाचे पायाचे हाड मोडले. देवरी शहरा लगत अपघात झाल्याने पोलीस तसेच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी गोळा झालेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येथ नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगने कटिंग करून, मृतास व जखमीस पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. यानंतर जखमीना १०८ रुग्ण वाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमी तरुणाला पुढील उपचाराकरिता गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर या अपघातातील दोन्ही मृतकांना देवरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरी तपासणी करिता पाठवण्यात आलेले आहे. देवरी पोलिसांनी सदर प्रकरण नोंद केले असून पुढील तपास देवरीचे पोलीस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गेडाम व पोलीस शिपाई करंजेकर करीत आहेत.