Nagpur Pune Mumbai Latest Marathi News : सवंग लोकप्रियतेसाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देण्याच्या योजनेत पुरते पोळून निघाल्यानंतर जागे झालेल्या राज्य सरकारने अखेर ही योजना गुंडाळण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

अक्षय तृतीयेसाठी कोकणातून आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेला आंब्यांचे दर जास्त आहेत. किरकोळ आणि घाऊक बाजारात तयार आंब्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. मागणीच्या तुलनेत तयार आंब्यांचा तुटवडा जाणवत आहे. मुंबई,पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News  Updates, 30  April 2025

 

10:59 (IST) 30 Apr 2025

मुंबई महापालिकेची नालेसफाईवर नजर… महापालिका मुख्यालयात ‘वॉर रुम’ सज्ज… एआयचा वापर…

मुंबईतील लहान - मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. नालेसफाईच्या कामात भ्रष्ठाचार होऊ नये म्हणून पालिकेने कंत्राटात विशिष्ट अटी समाविष्ट केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
10:50 (IST) 30 Apr 2025

सोन्याच्या दरात आपटी… अक्षय तृतीयेच्या दिवशीच…

लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशीच बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...सविस्तर वाचा
10:43 (IST) 30 Apr 2025

टांझानियातील रुग्ण पुन्हा चालू लागला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

आधी झालेल्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे गुंतागुंत होऊन टांझानियातील रुग्णाला चालण्यास त्रास होऊ लागला.त्याचे चालणे बंद झाल्याने अखेर त्याला पुण्यात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी या रुग्णाच्या मांडीच्या पूर्ण हाडाचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या केले. यामुळे हा रुग्ण पुन्हा चालू लागला आहे. ...सविस्तर वाचा
10:42 (IST) 30 Apr 2025

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जूनला प्रस्थान; यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष

जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. १९ दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा ६ जुलै रोजी पंढरीत दाखल होईल ...वाचा सविस्तर
10:35 (IST) 30 Apr 2025

अन् वडिलांच्या वृद्धपकाळाचा आधार झाली मुलगी, गैरसमजातून तुटला होता संसार

मुलीच्या लग्नाची तयारी म्हणून एक भूखंड घेऊन ठेवल्याचे सांगून फक्त मला तुमच्या सानिध्यात राहू द्या, आजारपणामुळे शेवटचे काही क्षण कुटुंबात राहण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व ऐकून दोन्ही मुलांनी वडिलांना कवटाळले. मुलीने वडिलाचा आधार बनून त्यांच्या आजारपणाची जबाबदारी घेतली. ...वाचा सविस्तर
10:31 (IST) 30 Apr 2025

कंपनीच्या जमाखर्चाचा अधिकार कामगाराला दिला, त्यानेच विश्वासघात करुन केले ७६ लाख लंपास

सुनीलकुमार यादव (३७) असे या कामगाराचे नाव आहे. भिवंडी येथील अस्मिता पार्क या भागात व्यापाऱ्याचा महिलांचे कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. ...सविस्तर वाचा
10:06 (IST) 30 Apr 2025

रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच, कार्यालयातून उशीरा सुटणाऱ्या नोकरदारांची गैरसोय होणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री १२.१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल. ...वाचा सविस्तर
10:03 (IST) 30 Apr 2025

ताडोबाच्या जंगलातील उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी धोक्याच्या, बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यात यश

मंगळवारी ताडोबा बफर झोन मध्ये भादुर्णा गावातील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले. ताडोबा रेस्क्यू पथकाने अथक परिश्रम करून या बिबट्याच्या पिल्लाचे प्राण वाचविले. त्यानंतर या पिल्लाला जंगलात मुक्त करण्यात आले. ...अधिक वाचा
10:00 (IST) 30 Apr 2025

बेस्ट दरवाढीला मुंबईच्या डबेवाल्यांचा विरोध, भाडेवाढ न करता बेस्टचा कारभार सुधारा

गेली काही वर्षे बेस्ट उपक्रमाच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे. ...सविस्तर वाचा
09:36 (IST) 30 Apr 2025

दररोज मूठभर बदाम भरून काढतील तुमची प्रथिनांची गरज

भारतीय नागरिकांच्या पोषणातील प्रथिनांची कमतरता यावर प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली. ...वाचा सविस्तर
09:04 (IST) 30 Apr 2025

घर बांधणीतील लातूर पॅटर्न महाराष्ट्राला दिशादर्शक, प्रफुल्ल तावरे

घरबांधणीतील लातूर पॅटर्न हा महाराष्ट्राला दिशादर्शक असून लातूर शहरातील क्रीडाई संस्थेचे काम राज्यात सर्वात अव्वल दर्जाचे असल्याचे प्रतिपादन क्रीडाईचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी केले ...सविस्तर बातमी

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे