Chandrakant Nimba Patil in Muktainagar Vidhan Sabha Election 2024 : मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यातील शहर असून ते पूर्णा नदीच्या काठी वसलेले आहे. १९६० च्या सुरुवातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मुक्ताईनगर येथून केली होती, तर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी १९८९ ते २०१९ पर्यंत मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेनेचे चंद्रकांत निंबा पाटील हे सध्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यापुढे कोणती आव्हाणे आहेत जाणून घेऊया.
शिवसेना – अपक्ष – शिवेसना असा प्रवास
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी चंद्रकांत निंबा पाटील हे शिवसेनेत होते, मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढल्यामुळे मुक्ताईनगर हा मतदारसंघ भाजपकडे गेला होता. त्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा शिवसेनेला साथ दिली.
हेही वाचा – महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”
हेही वाचा – History of exit polls: भारतातील मतदानोत्तर चाचण्यांची (एग्झिट पोल) सुरुवात कधी झाली?
चंद्रकांत निंबा पाटलांसमोर कोणते आव्हान?
मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत निंबा पाटील यांनी फार कमी फरकाने रोहिणी खडसे यांना पराभूत केले होते. त्या निवडणुकीत रोहिणी खडसे या भाजपकडून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. मात्र आता त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. रोहिणी यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदावारी मिळाली आहे. चंद्रकांत निंबा पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात चुरस आहे. त्यांच्यातील सामन्यात कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.