सिडकोतील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याच्या धमकीबाबत अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजय गायकवाड या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा करुन शहाणे यांनी गुरुवारी अंबड पोलीस ठाण्यात समर्थकांसह तक्रार केली.

हेही वाचा >>> नाशिक : बंधाऱ्यात एकाचा तर, विहिरीत दोघांचे मृतदेह

तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी माजी नगरसेवक दिनकर पाटील, सतीश सोनवणे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, रवी पाटील, शशी जाधव, राहुल गणोरे, अजिंक्य गिते आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात ठाकरे गटाचे सुधाकर बडुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण, त्यांच्या मुलाचा गोळीबारातील संबंध यासह अन्य काही प्रकरणांवर सातत्याने आवाज उठवत असून बडगुजर यांचा वरदहस्त असल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप शहाणे यांनी केला. सदर प्रकरणामुळे सिडकोतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>> Suspicious Death In Dhule : एकाच कुटूंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरूनच मला भ्रमणध्वनी करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यास बडगुजर हेच कारणीभूत असतील. धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीही भेट घेणार आहे. – मुकेश शहाणे ( माजी नगरसेवक, भाजप)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिनबुडाचे आरोप

पवननगर गोळीबार प्रकरणात मुकेश शहाणे याला अटक करण्याची मागणी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केली आहे. महिला आघाडी राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांचीही भेट घेणार आहे. त्यामुळे विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. भ्रमणध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी माझा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. – सुधाकर बडगुजर (जिल्हाप्रप्रुख, ठाकरे गट)