पूनम सकपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाने डाळींच्या उत्पादनाला फटका बसला आहे, त्यामुळे बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात वाढ होत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातुन दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे.परिणामी किरकोळ बाजारात डाळींचे दर ३०% ते ३५% तर कडधान्यांचे दर २०% ते २२% कडाडले आहेत. तूरडाळ १५० रुपये किलो तर काबुली चणे १५० रुपये किलोपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे.

सणासुदीच्या काळात डाळींना अधिक मागणी असते. श्रावण महिन्यापासून सणांची सुरुवात होते. तसेच भाजीपाला महाग होत असल्याने गृहिणी डाळींकडे मोर्चा वळवितात . विशेषतः चवळी, हरभरा ,तूर,मूग, उडीद डाळीला अधिक पसंती दिली जाते. सध्या एपीएमसी घाऊक बाजारात कडधान्य आणि डाळींची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळी ३०% ते ३५% तर कडधान्ये २०% ते २२% कडाडली आहेत. डाळी चढ्या दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात.

हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय…

मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून बाजारात डाळींची आवक घटली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो तूरडाळ आधी ११५-१२०रुपयांवरून आता १५०रुपये तर मुगडाळ ९०रुपयांनी उपलब्ध होती ती आता १००रुपयांवर पोचली आहे. चणाडाळ ५५-६०रुपये होती ती आता ८०-८५रुपयांनी विक्री होत आहे, तर कडधान्यमध्ये काबुली चणे १००-१२०रुपयांनी उपलब्ध ते आता १५०-१६०रुपये आहेत.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसीत कांदा आवक निम्यावर, दरात वाढ

श्रावणात शाकाहारीकडे अधिक कल असतो. त्यामुळे आम्ही भाजीपाल्यासह डाळींना अधिक प्राधान्य देतो.मात्र सध्या भाजीचे दर कमी झाले असले तरी कडधान्ये, डाळींच्या दराने मात्र बजेट कोलमलडे आहे. डाळींना करिता आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.-राधिका जगताप, गृहिणी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in price due to reduced arrival of pulses in the market navi mumbai amy
First published on: 22-08-2023 at 18:01 IST