नवी मुंबई महानगरपालिका संचालित सीबीएसई शाळा क्रमांक ९४ कोपरखैरणे येथे दि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन मोठ्या दिमाखदार स्वरूपात झाले.

हेही वाचा- नवी मुंबई : सानपाडा कांदळवनात संशयास्पद आग…हतबल अग्निशमन दल

यावेळी मान्यवरांचे स्वागत भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या विविध राज्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून मशाल पेटवून ती विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या मैदानावर फिरवण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छता, रहदारीचे नियम ,स्वच्छ सर्वेक्षण, पर्यावरण जतन, माझी वसुंधरा, तंबाखूमुक्त शाळा इत्यादींबाबत प्रबोधनपर बोधवाक्य लिहिलेले फलक व फुगे देण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकाशात शालेय नामफलक व फुगे सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे सुधाकर सोनवणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक मारुती गवळी यांचे विशेष कौतुक करत, अत्यंत कमी शिक्षक वर्ग असताना देखील फार छानदार आयोजन केल्याचे सांगितले. याचवेळी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळेला आवश्यक तेवढे शिक्षक न पुरवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. लवकरात लवकर शाळेला आवश्यतेनुसार शिक्षकवृंद उपब्धतेसाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील दिले.

हेही वाचा- अमृत योजनेअंतर्गत प्रक्रियायुक्त पाणी विक्रीसाठी नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शाळेतील शिक्षक आशिष रंगारी कविता वाडे, प्रमोद बामले यांनी तयार केलेले विशेष मास ड्रिल, एरोबिक्स, बॉल ड्रिल मोठ्या उत्साहात सादर करण्यात आले. वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो ,लंगडी, धावणे ,रिले, गोळा फेक ,लांब उडी ,रिंगरेस तसेच लहान मुलांसाठी विविध आकर्षक बौद्धिक खेळांचे देखील आयोजन या करण्यात आले आहे. यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.