बिहारमध्ये आता निवडणुका येऊ घातल्या आहेत. जेव्हा हवामान बदलते तेव्हा जुन्या कहाण्या आपोआप डबक्यातून बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर येऊ लागतात. सध्या बिहारमध्ये चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील दुकाने, विक्रेते आणि गावागावात प्रभुनाथ सिंह हेच नाव चर्चेत दिसत आहे. खासदार प्रभुनाथ सिंह एकेकाळी छाप्राचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे. १९९० ते २००० काळादरम्यान प्रभुनाथ सिंह केवळ एक नेता नव्हता, तर त्याला राजपूत अस्मितेचे प्रतीक मानले जात होते. त्याशिवाय त्याला सरणचे शेर, राजपूतांचा तारणहार अशा नावांनी संबोधले जाई. त्याच्या एका संकेताने छाप्रा, मसरख, महाराजगंज व गोपाळगंज येथील राजपूत एकाच दिशेला मतदान करीत असत. त्यावेळी असे म्हटले जायचे की, जर देवाने तिकीट निश्चित केले, तर निकाल ही फक्त औपचारिकता असायची. प्रभुनाथ सिंह याची राजकीय ताकद इतकी होती की, लालू यादव, नितीश कुमार व जॉर्ज फर्नांडिस यांची त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमतच कधी झाली नाही.
९० च्या दशकात जेव्हा लालू यादव यांचे सरकार अगदी सत्तेच्या टोकावर होते, तेव्हा एक अशी घटना समोर आली, जी सगळ्यांनाच विचार करायला लावणारी होती. ‘जर तो न्यायाधीशांच्या घरात घुसला नसता, तर प्रभुनाथाचा सामना निश्चितपणे एन्काउंटरशी होणार होता’ हा काही चित्रपटातला संवाद नव्हता, तर त्या काळातील राजकीय कारस्थानांचा तो एक भाग होता. पत्रकार कन्हैया भेलारी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रभुनाथ याने लालूंच्या नेतृत्वासमोर झुकावे, अशी लालूंची इच्छा होती. मात्र, राजपूतांचा हा दबंग घाबरण्यास किंवा झुकण्यास तयार नव्हता.
एन्काउंटरची कहाणी- अफवा की सत्य?
ही कहाणी त्या काळातली आहे, जेव्हा यादव आणि राजपूत राजकारणात दुफळी निर्माण झाली होती. प्रभुनाथ सिंह याने आनंद मोहन यांच्यासोबत बिहार पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. लालूंना वाटले की, हे लोक राजपूतांना एकत्र करू शकतात आणि राजकीय परिस्थिती बदलू शकतात. काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा चकमकीची बातमी आली तेव्हा प्रभुनाथ याने थेट एका न्यायाधीशाच्या घरात आश्रय घेतला. अधिकाऱ्यांचा ताफा तिथून परतला आणि गोळीबार होण्यापूर्वीच बंदुका खाली घेण्यात आल्या. हा प्रसंग किंवा या संदर्भातील कोणतीही माहिती न्यायालयात सिद्ध झालेली नसली तरी ही कहाणी अजूनही बिहारच्या तेव्हाच्या लोकांच्या व्यवस्थित लक्षात आहे.
राजपूतांचा सिंह- मोठ्या भागात प्रभाव
प्रभुनाथ सिंह केवळ एक नेता नव्हता, तर त्याला राजपूत अस्मितेचे प्रतीकही मानले जात असे. त्याला सरनचा शेर, राजपूतांचा तारणहार अशा पदव्या देण्यात आल्या. त्याच्या एका इशाऱ्यावर छाप्रा, मसरख, महाराजगंज व गोपाळगंजचे राजपूत त्याने सांगितल्याप्रमाणेच मतदानही करत. लालू यादव, नितीश कपमार व जॉर्ज फर्नांडिस यांची सिंह यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत नव्हती.
प्रभुनाथ सिंह याच्या इतर कहाण्या
पटनातील एका फ्लॅटमध्ये लग्न होते; मात्र शहरात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी पसरली. तो फक्त लग्नाच्या पार्टी आणि फटाक्यांचा आवाज होता हे नंतर निष्पन्न झाले; पण त्यामुळे प्रभुनाथ सिंह याची भीती आणखी वाढली. २००९ मध्ये ते एका आयएएस अधिकाऱ्याला म्हणाले होते की, कफन खरेदी करण्याची धमकी देऊन ते चर्चेचा विषय ठरले होते. तो, निवडणुका थांबवल्या, तर कफन खरेदी कर… असे म्हणाले होते. त्याचा तो व्हिडीओ व्हायरलही झाला होता. २०१४ मध्ये झालेल्या त्याच्या पराभवावर स्वत:च खिल्ली उडवत तो म्हणाला होता, “मला पराभवाचे दु:ख नाही. मी एका बकरीकडून हरलो आहे, हेच माझे दु:ख आहे.” प्रभुनाथ हे व्यंग आणि गुंडगिरीचे मिश्र उदाहरण होते, असे म्हटले जाते.
प्रभुनाथ सिंह हा सध्या हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १९९५ च्या मसरख निवडणुकीच्या दिवशी झालेल्या खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. अशोक सिंह हत्या प्रकरणात त्याला प्रथम निर्दोष मुक्त करण्यात आले; मात्र नंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. सध्या तो तुरुंगाबाहेर येण्याचा प्रश्नच नाही.; पण त्याच्या कुटुंबाचा झेंडा अजूनही राजकारणात उंच फडकताना दिसतो. त्याचा भाऊ केंदारनाथ सिंह हा बनियापूर इथला आमदार आहे. मुलगा रणधीर सिंह याने २०२४ मध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षाला राम राम ठोकला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवfण्याची घोषणा केली; मात्र नंतर त्याने प्रत्यक्षात निवडणूक लढवलीच नाही.
एवढ्या वर्षांनी पुन्हा त्या आठवणी कशासाठी?
बिहारमधील छाप्रा येथे काही दिवसांपूर्वी लूटमारीची घटना घडली. शिवभवानी गॅस एजन्सीमधून दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून साडेपाच लाखांहून अधिक रक्कम लुटण्यात आली. ही एजन्सी प्रभुनाथ सिंह यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे प्रभुनाथ सिंह याच्या कार्यकाळात आमदार असलेले व जेडीयूचे जिल्हा महासचिव अनिल सिंह यांनी त्यांच्या काही समर्थकांना एकत्रित करून, प्रभुनाथ सिंह याची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी जनआंदोलनाची हाक दिली आहे. अनेक गरीब लोकांना वाचा फोडण्यास प्रवृत्त केल्याचे काम त्याने केल्याचे यावेळी सिंह यांनी सांगितले. तसेच प्रभुनाथ सिंह याला खोट्या आरोपांखाली तुरुंगात पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी सातत्याने संपर्क साधून आम्ही आमच्या नेत्याच्या सुटकेची मागणी करीत आहोत. सारणच्या जनतेला विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या नेत्याची सुटका झालेली पाहायचे आहे, असेही अनिल सिंह म्हणाले.