बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा महागटबंधन बनवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा एक विक्रम आहे. नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवशी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांचे जुने सहकारी आहेत. ते म्हणाले की “बिहारमधील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे कोणालाही आश्चर्य वाटू नये कारण हा नितीश यांचा सहावा प्रयोग आहे. २०१२ पासून नितीशकुमार यांनी सरकार स्थापन केले आहे. या कालावधीत नितीश हेच मुख्यमंत्री आहेत. याकाळात बिहारचा विकास दर प्रचंड खालावला आहे. 

प्रशांत किशोए हे २०२५ मध्ये त्यांच्या जन सूरज या संघटनेद्वारे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यांनी याला “राज्य विशिष्ट विकास” म्हटले आहे. प्रशांत किशोरने यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, “ राज्यात केवळ नितीशकुमार हेच मुख्यमंत्री म्हणून स्थिर राहिले आहेत. बाकी राज्यातील आरोग्यसेवा आणि शिक्षणाची स्थिती खराब आहे. २०१४-१५ पासून परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. आता हे नवे सरकार कसे कार्य करते आणि युती कशी टिकते हे पहावे लागेल ”.

नितीश यांनी भाजपाशी युती का तोडली आणि नंतर त्यांना कोंडीत पकडण्यात त्यांचा प्रयत्न असणार आहे का, यावर किशोर म्हणाले की “नितीशजी २०१५ पूर्वी एनडीएच्या सोबत असताना कधीही समाधानी नव्हते. नव्याने स्थापन केलेल्या महागठबंधनात आज ते खुश दिसत असले तरी पुढील मार्ग खडतर असणार आहे. ही निवडणूकोत्तर युती आहे. त्यामुळे या युतीपुढे आणखी आव्हाने असणार आहेत.” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश यांना विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून प्रक्षेपित केल्याबद्दल किशोर म्हणाले, “त्यांनी २०१४ मध्येही हा प्रयत्न केला होता आणि त्यांना थोडा पाठिंबा मिळाला होता. पण हेतू असणे ही एक गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्षात आणणे ही दुसरी गोष्ट आहे.”