पुणे विभागात मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज पुणे विभागात एकाच दिवसात 81 रुग्ण आढळले आहे. तर त्याच दरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तसेच विभागात  1 हजार 986 इतकी करोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून आतापर्यंत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त  म्हणाले, पुणे विभागात 1 हजार 986 बाधित रुग्ण असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 783 बाधीत रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्हयात 52 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 106 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 31 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर  जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचे त्यांनी सांगितले.