करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत आलेले लघु उद्योजक गेल्या चार महिन्यांत के लेल्या मालाचे पैसे मोठय़ा उद्योजकांनी न दिल्याने घायकु तीला आले आहेत. या उद्योजकांनी उद्योग विभागाच्या सूक्ष्म, लघु उपक्रम सुकरता परिषदेकडे तक्रारी दाखल के ल्या आहेत. अशा प्रकारची तब्बल एक हजारपेक्षा अधिक प्रकरणे परिषदेकडे आली आहेत.
मार्च महिन्यात टाळेबंदी लागू के ल्यानंतर अत्यावश्यक उद्योग सुरूच होते. या काळात लघु उद्योजकांनी मोठय़ा उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा के ला. नियमानुसार ४५ दिवसांत पैसे मिळणे अपेक्षित असताना गेल्या चार महिन्यांपासून पूर्ण पैसे मिळालेले नसल्याच्या तक्रारी आहेत. लघु उद्योजकांनी पुरवठा के ल्यानंतर थकबाकी वेळेत मिळण्यासाठी राज्य सरकारने सुकरता परिषदेची स्थापना के ली आहे. लघु, मध्यम उद्योगांसाठीच्या २००६ च्या कायद्यानुसार खरेदीदाराने विहित कालावधीत पैसे न दिल्यास पुरवठादाराला तीनपट दंडासह व्याज देण्याची तरतूद आहे. मात्र, टाळेबंदीमुळे मोठे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने त्यांच्याकडून लघु उद्योजकांना पैसे देण्यात अडचणी असल्याचे निरीक्षण उद्योग विभागाने नोंदवले.
याबाबत बोलताना पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ‘टाळेबंदी काळात अनेक लघु उद्योजकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या समितीकडे सन २०१३ पासूनच्या तक्रारी आहेत. लघु उद्योजकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी, विभाग स्थापण्याची आमची मागणी आहे. ज्या उद्योजकांकडे लघु उद्योजकांची देणी आहेत, त्यांना परिषदेचा धाक वाटत नसल्याचे चित्र आहे. अनेक लघु उद्योजक तक्रार के ल्यास भविष्यात काम मिळणार नाही आणि विलंबाने का होईना, मिळणारे पैसेही मिळणार नाहीत म्हणून तक्रारी करत नाहीत. त्यामुळे या परिषदेकडे आलेल्या लघु उद्योजकांच्या तक्रारी हिमनगाचे टोक आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.’
जिल्ह्य़ातील उद्योग
पुणे जिल्ह्य़ात दोन लाख ३४ हजार ६७७ विविध उद्योग असून त्यामध्ये साडेसोळा लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी मोठय़ा उद्योगांची संख्या ६७७ एवढी असून लघु, मध्यम, सेवा उद्योग दोन लाख ३४ हजार एवढे आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड, इंदापूर, कु रकु ंभ, चाकण, जेजुरी, बारामती, रांजणगाव, हिंजवडी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.