Desi Jugaad Video Viral : पावसाळ्यात महिलांना सर्वाधिक चिंता असते ती म्हणजे कपडे कसे सुकवायचे. यात मोकळ्या छतावर किंवा बाल्कनीत कपडे सुकत घालायचे म्हणजे कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. यात अनेक महिला छतावर सुकत घातलेले कपडे काढण्यास विसरतात अशाने चांगले सुकलेले कपडेही पावसाने भिजतात. याच समस्येवर आता एका महिलेने एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. जो पाहून युजर्सही चक्रावलेत. या जुगाडचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
महिलेच्या या भन्नाट जुगाडमुळे छतावरील कपडे पावसात ओले होण्यापासून वाचतील खरे पण सुकतील की नाही याची काहीच हमी नाही. कारण कपड्यांवर तिने प्लास्टिकचे कव्हर टाकलेय, त्यामुळे ऊन पडल्यानंतरही ते प्लास्टिक कव्हर काढले तर ठीक, नाहीतर कपडे नीट सुकणार नाहीत. त्यामुळे हा जुगाड फक्त पावसातच उपयोगी ठरु शकतो. तोही कपडे ओले होण्यासाठी वाचण्यासाठी.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिलेने छतावर बांधलेल्या एका दोरीवर कपडे सुकत घातलेत. हे कपडे पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी तिने दोरीवर एक मोठं प्लास्टिक ठेवलं आहे. जेव्हा पाऊस येण्यास सुरुवात होते तेव्हा ही महिला धावत येते आणि कपडे त्या प्लास्टिकने झाकते. यामुळे कितीही मुसळधार पाऊस आला तरी कपडे भिजणार नाहीत. पण ते अशाप्रकारे कपडे झाकून सुकतील की नाही हा एक प्रश्न आहे.
महिलेचा हा जुगाड व्हिडीओ @antim_jatin_dhiman नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्हालाही पावसात वारंवार हा त्रास होतोय का?” या जुगाड व्हिडीओवर आता युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, कल्पना चांगली आहे, पण कपडे कसे सुकतील? दुसऱ्याने लिहिले की, माझी आई अगदी असेच करते. तिसऱ्याने लिहिले की, छा गए गुरु, काय डोकं वापरलं आहे?