महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये वसलेला प्रदेश आहे त्यामुळे इथे गड-किल्ले, डोंगर-दऱ्या, धबधबे अशा निसर्गसौदंर्य आणि इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सुट्टी दिवशी सिंहगडपासून – ताम्हिणीघाटाला अनेक हौशी पर्यटक अन् ट्रेकर्स आवर्जून भेट देतात. विशेषत: पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळे पावसळ्यात सिंहगडापासून ताम्हिणी घाटापर्यंत शनिवार आणि रविवारी पर्यटक अन् ट्रेकर्सची प्रचंड गर्दी होते. ही इतकी गर्दी इतकी वाढली आहे की गड किल्यांवर पाय ठेवण्यासाठी देखील जागा उरलेली नाही. इंद्रायणी नदी किनारी वसलेले कुंडमळा येथील पूल तुटल्याची दुर्घटना ताजी असतानाचा पुन्हा धोकादायक पर्यटनाचे नवीन व्हिडिओ समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी हरीहर गडावरील टेकर्सची गर्दीचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता अंधारबनमधील पर्यटकांच्या गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर अंधारबन येथील पर्यटकांच्या गर्दीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्हिडीओमध्ये गेटवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पोलिस गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तरी काही लोक गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये गेटच्या बाहेर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. तिसऱ्या व्हिडीओमध्ये घनदाट जंगलाच्या पायवाटेवर पर्यटकांची मोठी रांग लागलेली दिसत आहे. चौथ्या व्हिडीओमध्ये अंधारबन जंगलातील विविध ठिकाणी दिसत आहे जिथे पर्यटकांची झुंबड उडाली आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी रोष व्यक्त केला. एकाने व्हिडिओ शेअर करताना लिहले की, शनिवार-रविवारी अंधारबनमध्ये जंगल ट्रेकसाठी जाऊ नका.
व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिले आहे की, “हिच सर्व लोक निसर्गाच्या आणि जंगली प्राण्यांच्या ऱ्हासाची कारण ठरणार आहेत”
दुसऱ्याने कमेंट केली की, “यातील एक पण व्यक्ती निसर्गासाठी एक झाडं लावणार नाही पण निसर्ग बघायला पाहिजे.”
तिसऱ्याने कमेंट केली की, बापरे केवढी ही गर्दी… कृपा करून प्लास्टिक फेकू नका कुठे.. गर्दी करा पण परिसर स्वच्छ ठेवा.”
चौथ्याने कमेंट केली की,”ही गर्दी गड किल्ले संवर्धन साठी नाही दिसणार”
पाचव्याने लिहले की, “महामूर्ख लोक जे निसर्गाचा सत्यानाश करायला गेलेत आत्ता प्लास्टिक बॉटल, पिशव्या सर्व तिथेच टाकणार.
आणखी एकाने लिहिले की, “साधारण १५-२० वर्षा पूर्वी पर्यंत असले बाहेर फिरायला जायचे फालतु चाळे कोणीच करत नव्हते. सुट्या लागल्या की गावी जाऊन मस्त एंजॉय करायचे एवढच ठाऊक होत सर्वांना.आता हजारो खर्च करून धोकादायक ठिकाणी जाऊन मरायचं आणि तेथील निसर्ग सगळा घाण प्रदुषित नष्ट भ्रष्ट करायचा एवढच चालू आहे सध्या. सगळा निव्वळ फालतूपणा मूर्खपणा आहे.”
दुसऱ्याने म्हटले की, काय हे.. किती गर्दीसगळं रिल बघून येतात. नक्की बोलावं कोणाला रिल बनवणाऱ्यांना की गर्दी करणाऱ्यांना..!!”
तिसऱ्याने कमेंट केली,”ट्रेकिंगच्या नावाखाली लोक वेडे झाले आहेत. निसर्ग आणि जंगलातील शांती नष्ट करत आहेत.“अंधारबन ट्रेकला एवढी पसंती का?
चौथ्याने लिहिले की,”स्वतःचा व्यवसाय मोठा करण्यासाठी निसर्गाची वाट लावणाऱ्या त्या प्रत्येक ट्रेक लीडर कढून कर आकारा”
अंधारबन हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मुळशी तालुक्याच्या पश्चिम घाटातील अंधारबन परिसरात अनेक पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक स्थान आहे, जो त्याच्या समृद्ध जैवविविधतेसाठी आणि पर्यावरणीय महत्त्वासाठी ओळखला जाते. हा ट्रेक पिंपरी गावाजवळून सुरू होतो, जो पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रत्येत आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी पर्यटक आणि टेकर्स मोठ्या उत्साहाने येथे येतात. हा ट्रेल भिरा धरणाकडे उतरतो, जिथे भव्य ताम्हिणी घाट आणि देवकुंड धबधबा देखील पाहता येतो.
अंधारबन, याचा अर्थ “गडद घनदाट जंगल” असेही म्हणतात, सह्याद्री पर्वतांच्या सुंदर निसर्गरम्य दृश्यांमधून एक रोमांचक प्रवासा अनुभव देते, विशेषतः पावसाळ्यात. सह्याद्री पर्वतरांगांचा हा भव्य भाग, ताम्हिणी घाटाला रम्य कोकण प्रदेशाशी जोडतो. हे नवीन किंवा अनुभवी गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण आहे. जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक लोक आवर्जून भेट देतात.