scorecardresearch

विमानात डान्स करणाऱ्या ‘त्या’ एअर हॉस्टेसचा नवा VIDEO VIRAL; Jugnu Dance चॅलेंज स्वीकारून साऱ्यांना केलं घायाळ

तुम्हाला तो क्रेझी व्हायरल व्हिडीओ आठवतोय का ज्यामध्ये एका सुंदर इंडिगो एअर होस्टेसने विमानात ‘मनिके मागे हिते’ या सिंहली गाण्यावर डान्स केला होता? होय आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील तिच्या डान्स स्टेप्स पाहून घायाळ व्हाल.

Air-Hostess-Aayat-Jugnu-Dance-Viral
(Photo: Instagram/ _aayat_official)

तुम्हाला तो क्रेझी व्हायरल व्हिडीओ आठवतोय का ज्यामध्ये एका सुंदर इंडिगो एअर होस्टेसने विमानात ‘मनिके मागे हिते’ या सिंहली गाण्यावर डान्स केला होता? डोक्यावर टोपी आणि अंगावर एअर होस्टेसचा युनिफॉर्म घालत रिकाम्या विमानात तिने केलेला गोड डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. बरं, आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय आणि यावेळी आणखी एक नवं चॅलेंज घेऊन आली आहे. या व्हायरल एअर होस्टेसने आता जुगनू चॅलेंज स्विकारलंय. इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या जुगनू चॅलेंजला फॉलो करत तिने जबरदस्त डान्स परफॉर्म केलाय. तिच्या या डान्सचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

काही दिवसांपूर्वी विमानात ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर डान्स करत प्रसिद्धीझोतात आलेल्या या एअर होस्टेसचं नाव आयत उर्फ़ आफरीन असं आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या जुगनू चॅलेंजवर अप्रतिम डान्स केलाय. या जुगनू चॅलेंजवर डान्स करत तिने आपल्या अदाकारीने नेटकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय. या व्हिडीओमध्ये ती सुप्रसिद्ध रॅपर बादशाहचं व्हायरल गाणं ‘जुगनू’ गाण्यातील काही हूक स्टेप करताना दिसून येतेय. यावेळी तिने सुंदर चेकर स्कर्टसह काळ्या रंगाचा फुल-स्लीव्ह टॉप घातला होता. डान्स करताना तिची उर्जा आणि दिलखेचक अदांमुळे नेटकरी मंडळी तिच्या प्रेमात पडले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घाबरून मुलगी म्हणाली, “माझं अजुन लग्न झालेलं नाही”, यावर उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भारीच! चोरांपासून नवी कोरी कार लपवण्यासाठी पठ्ठ्यानं केला असा जबरदस्त जुगाड; हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

ज्या उर्जेने तिने डान्स केलाय ते पाहून नेटकरीही तिच्या नव्या व्हिडीओला उत्तम उत्तम प्रतिसाद देत आहे. तिचे लटके झटके पाहून चाहते म्हणत आहेत की, जीव घेणार काय आता…तिचा हा डान्स नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ६४ हजरा व्ह्यूज मिळाले आहेत. तर २३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी तिच्या या डान्स व्हिडीओला लाइक केलंय. तिच्या या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची तिच्या स्टायलिश अंदाज आणि डान्सचं कौतुक करत कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

आणखी वाचा : टांझानियाच्या ‘त्या’ तरुणाने सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर केलं लिपसिंक; VIRAL VIDEO पाहून लोक भारावले

काय आहे ‘जुगनू चॅलेंज’ ?

सुप्रसिद्ध रॅपर बादशाहचा ‘जुगनू’ हा नवा अल्बम सॉंग आहे. त्याच्या या गाण्यावर बादशाहने काही हूक स्टेप करत सोशल मीडियावर डान्सचा व्हिडीओ शेअऱ करत लोकांना या गाण्यातील डान्सचं चॅलेंज दिलंय. जुगनू हे गाणं सध्या सुपरहिट होत असून तसतसं या जुगनू डान्स चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागलीय. प्रत्येकजण बादशाहने केलेल्या स्टेपला कॉपी करत या चॅलेंजमध्ये आपले डान्स व्हिडीओ शेअर करत आहेत. या चॅलेंजमध्ये सामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड स्टारदेखील सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट या दोघींनीही देखील जुगनू चॅलेंज स्विकारलं होतं. त्यानंतर आता व्हायरल एअर होस्टेसच्या नव्या व्हिडीओची प्रचंड चर्चा सुरूय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indigo air hostess who danced to manike mage hithe signs up for the jugnu challenge viral video google trending video prp

ताज्या बातम्या