Mumbai indians: आयपीएल २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी रोहित शर्माला हटवून आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. मुंबईने आज हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिले गेल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅन्सनी चक्क मुंबई इंडियन्सची जर्सी जाळली

हार्दिक पंड्याला मुंबईने कर्णधारपद देताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. कुणी या निर्णयाचे स्वागत केलेय; तर काहींनी टीका केली आहे. हार्दिक पंड्या मुंबईच्या ताफ्यात पुन्हा सामील झाल्यानंतर कर्णधार होईल, असा अंदाज बांधला जात होता. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय चाहत्यांना फारसा आवडला नाही. त्यामुळे काही संतप्त फॅन्सनी चक्क मुंबई इंडियन्सची जर्सीच जाळली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सला केलं अनफॉलो

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने मुंबई इंडियन्सची जर्सी पेटवल्याचे पाहायला मिळत आहे.आणखी एका चाहत्याने मुंबई इंडियन्सची कॅप जाळली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला फॉलोअर्सचाही फटका बसला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यापासून चाहते सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करीत आहेत. मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत; तर एक्सवर चार लाखांहून अधिक लोकांनी अनफॉलो केले आहे.

​‘यापुढे मुंबई इंडियन्सला सपोर्ट नाही’

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चाहत्यांनी चक्क मुंबई इंडियन्सची जर्सी पेटवल्याचे पाहायला मिळत आहे. एका झाडाला ही जर्सी लावून फॅन्सनी ती पेटवली आहे. यातून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची नाराजी पाहायला मिळत आहे. #HardikPandya #RohitSharma? #MumbaiIndians हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. हार्दिकला कर्णधार केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ​‘यापुढे मुंबई इंडियन्सला सपोर्ट नाही’, संतापलेले फॅन्स हार्दिक पांड्याला ट्रोल करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रोहित शर्मा पायउतार होताच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचं नुकसान; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी!

हार्दिकने गेल्या दोन हंगामांत गुजरातचे नेतृत्व केले होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ दोनदा अंतिम फेरी गाठण्यात आणि एकदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावले. याआधी मुंबईसाठी इतर कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी केली नव्हती. तसेच रोहित शर्माने आयपीएलमध्ये सहा हजार धावांचा आकडा पार केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians fans burn jerseys after hardik pandya replaces rohit sharma as captain watch video srk
First published on: 16-12-2023 at 12:50 IST