scorecardresearch

Premium

Swarm of bees: या माणसाचा हात भरलाय चक्क मधमाश्याच्या पोळ्याने; पाठीवर राणी माशी घेऊन ऐटीत फिरणाऱ्या व्यक्तीचा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माणूस चक्क हातावर मधमाश्यांचे पोळे घेऊन फिरत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

sworn of bees on man arms
photo(social media)

तुम्ही अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडीओ पाहिले असतील जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसेल. असे अनेक व्हिडीओ आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल. या व्हिडीओमध्ये एका मुलाच्या डाव्या हातावर मधमाशांचे पोळे भरलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे तो मुलगा ते पोळ स्वतःसोबत घेऊन गल्लीभर फिरत आहे.

मधमाश्या त्याला चिकटून राहिल्या आहेत

खरं तर ही घटना अमेरिकेतील असल्याचं म्हटलं जातं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलाचे मधमाशांचे दुकान आहे आणि तो मधाचा व्यवसाय करतो, परंतु मधमाश्यांचे त्याला अशाप्रकारे चिकटून राहणे खरंच धक्कादायक आहे. कारण मधमाश्या कोणालाही सोडत नाहीत. त्या जो मिळेल त्याला डंख मारत सुटतात.

Octopus wrapped around the face of a person who had gone to bathe in the sea
VIDEO: समुद्रात अंघोळ करायला गेलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिकटला ‘ऑक्टोपस’, सुटका करताना डॉक्टरांच्या आले नाकी नऊ
wildlife expert and biologist terrifying video
जंगलात व्हिडीओ शूट करतानाच व्यक्तीच्या अंगावर पडली वीज; थरारक घटनेचा VIDEO होतोय व्हायरल
A person uses a railway track to reach another platform and in the process his slipper falls off
लोकल ट्रेन समोरून येत असताना तो ट्रॅकवर चप्पल घालू लागला अन् क्षणात…VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Conjunctivitis
Health Special: डोळे येण्याची लक्षणं काय आणि उपचार काय करावेत?

( हे ही वाचा: नवरीला मागे बसवत नवऱ्याने हवेत उडवली फिल्मी स्टाईल बाईक; जगावेगळे प्री-वेडिंग फोटोशूट पाहण्यासाठी हा Viral Video एकदा पाहाच)

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलाच्या डाव्या हाताला या मधमाशा बसल्याचे दिसत आहे. त्याने यावेळी आपली मुठ घट्ट पकडली दिसत आहे आणि बाकीच्या मधमाश्या त्याच्या हाताला लटकलेल्या आहेत. मात्र यामागचे कारण समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. या मधमाशांना एका मोठ्या युक्तीने नियंत्रित केले गेले आहे.

मधमाशा व्यक्तीच्या हातावर कशा बसल्या ते एकदा पाहाच

( हे ही वाचा: अजगराच्या जवळ जात ‘हॅलो बेबी’ म्हणणं महिलेला पडलं भारी; पुढच्याच क्षणी हात दिसेनासा झाला अन…पाहा Viral Video)

मिडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलाने राणी मधमाशी आपल्या मुठीत धरली होती. त्यामुळे कदाचित त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. मात्र मधमाश्यांनी त्याला किंचितही इजा केली नाही. याचे कारण असे असू शकते की हा मुलगा या मधमाशांचे दुकान चालवतो. सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swarm of bees on the arms of man moving in society with no pain gps

First published on: 28-10-2022 at 18:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×