दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाची क्रेझ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा’चे धमाकेदार संवाद, धमाल गाणी आणि त्याच्या हुक स्टेप्सचे सोशल मीडियावर ट्रेंड आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत तरीही भारतीय काय, परदेशीही चित्रपटाच्या ‘श्रावल्ली’ गाण्याच्या हुक स्टेप्सवर इंस्टाग्राम रिल्स बनवताना थकत नाहीयेत. आता पुष्पा राज (अल्लू अर्जुन) आणि श्रीवल्ली (रश्मिका मंदान्ना) यांची साडी चर्चेचा विषय बनली आहे.

‘पुष्पाच्या क्रेझ’मुळे बनवली साडी

रिपोर्ट्सनुसार, सुरतच्या प्रसिद्ध कापड बाजारातही ‘पुष्पा’ची क्रेझ पाहायला मिळाली. जिथे एक साडी व्यापारी ‘पुष्पा’चं पोस्टर प्रिंटसह साड्या विकत आहे. लोकांमध्ये या साड्यांना खूप मागणी असल्याचा दावा केला जात आहे. ‘चरणजीत क्रिएशन’च्या नावाने साडीचा व्यवसाय करणाऱ्या चरणपाल सिंह यांनी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पोस्टरच्या चित्रासह साडी तयार करून घेतली आहे.

(हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला साप तुम्ही शोधू शकता का? जुनी पोस्ट Viral)

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साडीला वेगवेगळ्या भागातून मागणी!

या चित्रपटाची लोकप्रियता पाहता चरणपाल यांनी सुरुवातीला ‘पुष्पा’ स्टाईलच्या दोन आणल्या. यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, त्यानंतर त्याला देशाच्या विविध भागातून ऑर्डर मिळू लागल्या. होय, व्यापारी चरणपाल यांनी दावा केला आहे की त्यांना राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार इत्यादी राज्यांतील कापड व्यापाऱ्यांकडून ‘पुष्पा साडी’च्या ऑर्डर मिळत आहेत.