Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, हे वाक्य तुम्ही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये ऐकलंच असेल. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीने करणं, याला खरं प्रेम म्हणतात. दरम्यान, आता सोशल मीडियाच्या काळात एका रील बनवणाऱ्या आजी-आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजी-आजोबा अभिनय करताना दिसत आहेत. यावेळी ते सैराट चित्रपटातील आर्ची-परश्याची लव्हस्टोरी सादर करताना दिसत आहेत. यावेळी ते अभिनय करताना आर्ची-परश्याचे काही प्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहेत. यावेळी आजोबा म्हणातात- “आर्चे तू मला लय आवडती.” यावर आजी म्हणतात, “मला पण तू लय आवडतो.” यावर आजोबा “काय?” असं विचारतात. यावर आजी त्यांना, “मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू.. आय लव्ह यू” असं म्हणते. त्यानंतर आजोबा डोळ्याला गॉगल लावून पुढे निघून जातात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vidyashinde_16_ या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत सात मिलियनहून अधिक व्ह्युज आल्या असून तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “आर्ची-परश्या रॉक”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आर्ची-परश्या म्हातारे झाल्यावर”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आयुष्याचा प्रत्येक वळणावर आनंद घेता आला पाहिजे.”