Jagannath Rath Yatra Viral Video : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात शुक्रवार २७ जूनपासून झाली आहे. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ भगवान बलभद्र व बहीण देवी सुभद्रा त्यांच्या जन्मस्थळी नऊ दिवसांसाठी जातात. दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक खूप गर्दी करतात. तर याचनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये काही चिमुकल्यांनी मिळून स्वतःची रथ यात्रा काढली आहे.
व्हायरल व्हिडीओ ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील आहे. प्रत्येकाला जगन्नाथ रथ यात्रेचा लाभ घ्यायला मिळेलच असं नाही. त्यामुळे भुवनेश्वर येथील काही चिमुकल्यांना स्वतःची जगन्नाथ रथ यात्रा घेऊन पायी चालत जाण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर या चिमुकल्यांच्या ग्रुपमधील प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे. कोणी पंडित, तर कोणी पूजेचं ताट घेऊन चालत आहे तर काही जण वाद्य वाजवण्याचे तर अनेक जण रथ सांभाळण्याचे काम करताना दिसत आहेत.
त्यांच्या निस्वार्थ भक्तीने देव खरोखरच प्रसन्न होईल (Viral Video)
तुम्ही देवाला फुल, नैवैद्य द्या किंवा नका देऊ फक्त मनापासून देवापुढे हात जोडा आणि तुमची भक्ती दाखवा. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, या चिमुकल्या मुलांनी सुद्धा असंच काहीस केलं आहे. जगन्नाथ रथ यात्रेला जायला न मिळाल्यामुळे चिमुकल्या भक्तांनी एका गाडीवर भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ भगवान बलभद्र व बहीण देवी सुभद्रा यांच्या मुर्त्या बसवल्या आहेत आणि नवल म्हणजे त्यांना सीटबेल्ट सुद्धा लावला आहे. त्याचबरोबर रथ यात्रेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन तसा पोशाख सुद्धा घातला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefakemediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जय जगन्नाथ’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “जेव्हा कुठलाच रस्ता सापडत नाही तेव्हा स्वतःचा रस्ता बनवायचा असतो” , “त्यांच्या निस्वार्थ भक्तीने देव खरोखरच प्रसन्न होईल”, “जर तुमच्या मनात भक्ती असेल तर शुभ प्रसंग साजरे करण्यापासून तुम्हाला काहीही रोखू शकत नाही” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहे…