Viral Video of Kids Koli Dance : बालपण हा आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ असतो असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणी कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण किती उत्सूक असायचो मग तो गणपतीमधील कोळी नृत्य असो किंवा दिवाळीतील किल्ले बांधणे असो….प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायचो. आता फक्त या सुंदर दिवसांच्या आठवणी आपल्या हातात असतात. आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देतात ती नव्या पिढीतील लहान मुलं. सोशल मीडियावर असाच काही गोंडस चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांना सर्वांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

गणपती म्हटलं की कोळी नृत्य हे ठरलेलं आहे. गणेशोत्सव हा कोळी नृत्याशिवाय पूर्णच होत नाही. आपल्यापैकी अनेकांनी बालपणी गणपतीमध्ये कोळी नृत्य सादर केले असेल. बालपणीच्या याच आठवणींना उजाळा देणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ सध्या चर्चेत येत आहे. व्हिडीओमध्ये दोन लहान मुली आणि एक लहान मुलगा कोळी नृत्याचा सराव करत आहेत. मी हाय कोळी गाण्यावर तिघेही नृत्य करत आहे. चिमुकल्यांनी कोळी पोशाष परिधान केला आहे. चिमुकल्या मुलींनी हातात टोपली घेतली तर चिमुकल्या गोंडस मुलाने हातात गदा घेतली आहे. गाणे सुरु होतेच तिघेही थिरकू लागतात. कोळी नृत्य करत तिघेही मस्त मज्जा करत आहेत. तिघांना पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. पण व्हिडीओमधील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडीओ इंस्टाग्रामवर agri_koli_stories पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

काहींनी चिमुकल्याच्या हातात गदा असल्यामुळे त्याला हनुमान, मारुती, गदाधारी भीम असे नाव दिले.

एकाने कमेंटमध्ये म्हटले की, “हनुमान भारी नाचतोय,

दुसऱ्याने म्हटले की,”छोटा मारुती सर्वात भारी नाचतोय”

तिसऱ्याने म्हटले की, “घरच्यांच्या दबावामुळे नाचतोय तो नाहीतर गदा घेऊन लढाईला जायचं होते”

चौथ्याने कमेंट केली की, ” रिचार्ज वसूल व्हिडीओ..आई गं कित्ती गोंडस!”

पाचव्याने कमेंट केली की, “हनुमान मस्त आहे”

एकाने म्हटले की, “मध्ये नाचणाऱ्या मुलीला बघा….किती गोंडस आहे.”