Video Man Recreated Yeh Ladka Hai Deewana Song With Daughter : करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून ‘ प्यार दोस्ती हैं’ हे तरुणाईच्या मनावर बिंबवलं होतं. कॉलेज, मैत्री, पाहिलं प्रेम आणि मग लग्न, असा प्रवास दाखवणाऱ्या या सिनेमाची गोष्ट, त्यातील गाणी, डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे अनेक जण आजही त्या सिनेमातील गाण्यांवर, डायलॉगवर रील्स बनवताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये बाबा आणि लेकीने या सिनेमातील एका खास गाण्यावर जबरदस्त अभिनय केला आहे.
व्हायरल व्हिडीओ बिरेन कुलंग यांनी इन्स्टाग्राम शेअर केला आहे. बॉलीवूड सिनेमा ‘कुछ कुछ होता है’मधील ‘ये लडका है दीवाना’ हे गाणे बाबा आणि लेकीने अगदी त्यांच्या स्टाईलने रिक्रिएट केलं आहे. बिरेन म्हणजे बाबा शाहरुखची भूमिका, तर त्याची मुलगी काजोलची भूमिका साकारताना दिसते आहे. दोघेही गाण्याच्या ओळी, डायलॉग अगदी आत्मविश्वासाने म्हणताना दिसत आहेत. या दोघांमध्ये जणू काही जुगलबंदी सुरूच आहे, असेही काही क्षणांसाठी तुम्हाला वाटेल.
बाबा आणि लेकीची सगळ्यात बेस्ट जोडी (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गाण्याच्या सुरुवातीला जोडून काही डायलॉग्ज असतात. हे डायलॉग्ज बाबा आणि लेक दोघेही अगदी अचूकपणे बोलतात. यादरम्यान दोघांची स्टाईल, दोघांचे परफेक्ट टायमिंग आणि दोघांचे हावभावसुद्धा अगदी कौतुक करण्यासारखे आहेत. ही खास रील बनवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा सराव केला असेल एवढं तर नक्की. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा बाबा-लेकीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @biren_kulung या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून बाबा आणि लेकीच्या प्रेमात पडले आहेत आणि “म्हणून मुलांना मुलं म्हणून पहिली मुलगीच हवी असते”, “बाबा आणि लेकीची सगळ्यात बेस्ट जोडी”, “तिचे हावभाव खूप मस्त आहेत”, “मला ही अशीच मुलगी पाहिजे”, “फक्त त्या कूल नेकलेसची कमतरता आहे”, “बाबा-लेक दोघेही क्युट आहेत” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.