Viral Video Shows Man Locked In A Room Full Of Snakes: साप बघताच किंवा पाहताच अनेकांना घाम फुटतो. पण, काही लोक असे असतात की, ज्यांच्यासाठी साप म्हणजे अगदी खेळणं. अशी माणसं सापाबरोबर खेळतात, त्याला अंगा-खांद्यावर खेळवतात. अशा काही लोकांचे व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिलेच असतील. आज सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका माणसाला एका खोलीत बंद करून ठेवलं आहे. एवढंच नाही, तर त्या बंद खोलीत अनेक सापसुद्धा दिसून आले आहेत. नक्की हा माणूस तिथे काय करायला गेला आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, एका छोट्याशा खोलीत अनेक साप ठेवण्यात आले आहेत. काही वेळाने त्या खोलीत छोट्याशा दरवाजातून एक माणूस काठी टेकवत येतो. माणूस आतमध्ये येताच तो खाली दरवाजाजवळ असणाऱ्या उंबरठ्याजवळ बसतो. नंतर बाहेरून माणसं दरवाजा बंद करून घेतात. पण, खोलीतील कॅमेऱ्यात तेथील सर्व घटना वा हालचालींचं शूट होत असतं. तर नेमकं पुढे काय घडलं, खोलीत असणाऱ्या सापांनी माणसावर हल्ला केला का ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…

हेही वाचा…Swiggy : भारीच! कॅटरर्स, हलवाई नव्हे, जोडप्यानं ऑनलाइन केलं जेवण ऑर्डर; साखरपुड्यात पाहुण्यांसाठी खास सोय; पाहा मजेशीर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्यक्तीनं दाखवलं भलतंच धाडस :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक माणूस छोट्याशा खोलीत येतो. त्या खोलीत एक-दोन नव्हे, तर खोलीभर साप असतात आणि त्यांच्यामध्ये हा माणूस एकटा असतो. पण, तो न घाबरता, त्या सापांना अगदी मांजर, श्वानाप्रमाणे कुरवाळताना आणि एका सापाला तर आपल्या पायावर खेळवतानाही दिसत आहे. तसेच व्हिडीओ पुढे जातो तेव्हा तो माणूस त्याच्या हातातील काठीने साप उचलून फेकतानासुद्धा दिसत आहे. हे पाहून तुम्हाला काही क्षणांसाठी भीती तर वाटेलच; पण त्या माणसाची हिंमत बघून त्याचं कौतुकही वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ali_gholami5752 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत ४२ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून, त्या माणसाच्या शौर्य आणि कौशल्याचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. आपल्यातील अनेक जण इतके साप पाहून नक्कीच पळ काढतील किंवा मदतीसाठी इतरांना बोलावून घेतील. पण, या माणसानं तर कोणाचीही मदत न घेता, साप असणाऱ्या खोलीत स्वतःला बंद करून अनोखं धाडस दाखवलं आहे.