News Flash

संशयित दरोडेखोर जेरबंद

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मखमलाबादच्या स्वामी विवेकानंदनगर भागात घातक शस्त्र घेऊन संशयास्पदपणे फिरणाऱ्या तीन जणांच्या टोळक्याला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले.

| August 28, 2014 07:01 am

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मखमलाबादच्या स्वामी विवेकानंदनगर भागात घातक शस्त्र घेऊन संशयास्पदपणे फिरणाऱ्या तीन जणांच्या टोळक्याला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळक्यातील चौथा संशयित अल्पवयीन आहे. त्यांच्याविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंदनगर भागात एक टोळके संशयास्पदपणे फिरत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी संबंधितांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवून संबंधितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी तलवार, नायलॉन दोरी व मिरची पूड हे साहित्य आढळून आले. हे टोळके दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी सोनु सुकदेव पवार, कन्हैय्या सुरेश पवार, उध्दव भिकन कासार याच्यासह दीपक रघुनाथ वळवी यांना ताब्यात घेतले. त्यातील दीपक हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यावर उर्वरित तिघांना अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 7:01 am

Web Title: suspect arrested in armed robbery
Next Stories
1 आडगावजवळील कालव्यात पडून वाहनधारकाचा मृत्यू
2 सिंहस्थात ‘सिम्युलेशन मॉडेल’द्वारे गर्दीचे व्यवस्थापन
3 मनसेच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा
Just Now!
X