मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे हिने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ती सहकुटुंब गाडी खरेदी करताना दिसते. अनेक कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे. प्राजक्ता सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ऋतुजा ही भूमिका साकारत आहे. याआधी तिने ‘जीव माझा गुंतला’ आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकांमध्ये काम केलं आहे.