मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता निधीच्या कमतरतेमुळे उशिरा मिळत आहे. राज्य सरकारने अनुसूचित जाती घटकांसाठी असलेले ४१० कोटी ३० लाख रुपये वळवून जूनचे अनुदान मंजूर केले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जूनच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.