Mangal Nakshatra Gochar : ग्रहांचे सेनापती आणि शक्तीचे कारक मंगळ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये ३० जून रोजी मंगळ गोचर करणार आणि याच नक्षत्रामध्ये २३ जुलै पर्यंत विराजमान राहणार.
पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे स्वामी ग्रह शुक्र आहे जे धन वैभव आणि प्रेमाचे कारक आहे. मंगळ हा शुक्राच्या नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. यामुळे तीन राशींसाठी अतिशय शुभ काळ सुरू होणार आहे. या राशींना धन संपत्ती, वृद्धी आणि करिअरमध्ये यश मिळेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढणार. मंगळ नक्षत्र गोचरपासून तीन नशीबवान राशींना लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Mesh Rashi)
मंगळ ग्रहाचे नक्षत्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीमध्ये मोठे पद प्राप्त करू शकते. या लोकांना व्यवसायात लाभ मिळू शकतो आणि पगारात वृद्धी होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरीची संधी मिळू शकते. आपल्या ध्येयांना प्राप्त करण्यात या लोकांना यश मिळेल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
सिंह राशी (Leo Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर आहे. या लोकांना पगारात चांगली वृद्धी होऊ शकते. एखाद्याच्या सल्ल्याने गुंतवणकीत चांगला लाभ मिळू शकतो. हे लोक जमीन, घर किंवा वाहन खरेदी करू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सलोखा वाढणार. घरात सुख शांती दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. या लोकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकते.
मकर राशी (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ नक्षत्र परिवर्तन शुभ फळ देणारे ठरू शकते. या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. मन प्रसन्न राहीन. या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये प्रेम वाढेन. घरात आनंदाचे वातावरण दिसून येईल. जुने स्वप्न पूर्ण होऊ शकतात.