छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) यांनी गुरुवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक खांडकेकर यांनी दिली. शेती करणारे गणेश कुबेर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आत्महत्या करत असून, जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, असा संदेश घरातील मुलांना शिकवण्यात येणार्‍या फलकावर लिहिल्याचे आढळून आले. गणेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, असा परिवार आहे.

तरुणांचे आंदोलन

मराठा समाजाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून चार ते पाच तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. सिटी चौक पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना बराचवेळ पोलिसांच्या एका मोठ्या वाहनात बसवून ठेवले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मशाल आंदोलन स्थगित

सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती चौकात दिवस-रात्र ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी मशाल घेऊन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आपतगाव येथील गणेश कुबेर यांनी आत्महत्या केल्यामुळे मशाल आंदोलन स्थगित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेश कुबेर यांनी आत्महत्या केल्याची घटना कळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तर, घटनास्थळी चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहचले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत, आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे.