छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून शिवसेना ( ठाकरे गट ) नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. मी मंत्री असताना पाच वर्षात एकही दंगल झाली नाही. पण, सध्याच्या गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. गृहमंत्री आणि मिंधे सरकारचं हे अपयश आहे. हे फक्त त्यांचे खोकेवाले लोक सांभाळतात, यांना जनता सांभाळता येत नाही.”

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

हेही वाचा : “माझ्यावरही दगडफेक झाली”, इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती, म्हणाले, “पोलिसांना…”

“२ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. त्यात विघ्न आणण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. एमआयएमला उचकवून देण्याचं काम करण्यात येत आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असं सर्व लोक म्हणत आहेत. महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद निवडणुकांसाठी हे सर्व सुरू आहे. याचा मास्टमारईंड देवेंद्र फडणवीस आहेत. तर, भागवत कराड आणि जलील हे मित्र आहेत. त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे,” असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

हेही वाचा : “…तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!

“महाविकास आघाडीच्या सभेवर कोणताही परिणाम होणार नाही. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. पण, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, त्यांना मारलं आहे. पोलिसांवर आवाज करून बोललं, तरी ३५३ चा गुन्हा दाखल करतात. मग, दंगल करणाऱ्या लोकांवर का गुन्हा दाखल करत नाही. आज संध्याकाळपर्यंत आरोपींना पकडण्यात यावं. अन्यथा शातंताप्रिय ठेवलेलं संभाजीनगर परत उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.