ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट हे आजपासून (गुरुवार) भारताच्या दौऱ्यावर येत असून आपल्या या दौऱ्याच्या प्रारंभीच ते विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुंबईत भेट घेणार आहेत. अॅबॉट यांच्या दौऱ्यास मुंबईतच प्रारंभ होत आहे.
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट, ब्रेट ली हेही अॅबॉट यांच्यासमवेत सचिनच्या भेटीप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या (दक्षिण) विभागाचे संयुक्त सचिव संजय भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. मुंबईत आल्यानंतर अॅबॉट हे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ येथे येऊन क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत चर्चा करतील. क्रीडा क्षेत्रातील सामंजस्य करारावर अॅबॉट स्वाक्षरी करतील, असे संकेत देण्यात आले. परंतु यासंबंधी अधिक तपशील मात्र मिळू शकला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2014 रोजी प्रकाशित
टोनी अॅबॉट सचिनला भेटणार
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट हे आजपासून (गुरुवार) भारताच्या दौऱ्यावर येत असून आपल्या या दौऱ्याच्या प्रारंभीच ते विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुंबईत भेट घेणार आहेत.
First published on: 04-09-2014 at 03:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian pm to meet sachin tendulkar