03 August 2020

News Flash

बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण?

संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असल्याची माहिती जेडीयूचे पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी दिली.

| May 18, 2014 01:09 am

नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असल्याची माहिती जेडीयूचे पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी दिली.
या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शरद यादव यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकट करण्यासाठी लालूंसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, नितीशकुमार यांचा राजीनामा हे एक राजकीय नाटक असून, जेडीयू पक्षातील अंतर्गत बंडाळीचा हा परिणाम आहे, अशी खोचक प्रतिक्रिया लोकशक्ती जनता पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2014 1:09 am

Web Title: who will be the next cm of bihar
Next Stories
1 ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीत नरेंद्र मोदींचा ‘रोड शो’
2 भारताच्या मावळत्या पंतप्रधानांचा राजीनामा
3 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा
Just Now!
X