आम आदमी पक्षाचे राज्य प्रभारी संजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर आम आदमी पार्टी यूपीमध्ये या तिरंगा शाखा चालवणार असल्याचं सांगितलं आहे. आप उत्तर प्रदेशातील लोकांना शिक्षित करण्यासाठी १० हजार तिरंगा शाखा उघडणार आहे. भाजपच्या “फोडा आणि राज्य करा” धोरणाबद्दल लोकांना सांगण्याचा आपचा हेतू असेल, असं असं राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितलं. या निर्णयावर भाजपाने निशाणा साधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत. आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशात तिरंगा शाखा सुरू करण्याच्या घोषणेवर अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयाला भेट देण्याचा सल्ला भाजप नेते परवेश साहिब सिंग वर्मा यांनी दिला आहे. जेणेकरून त्यांना राष्ट्रवाद चांगल्या प्रकारे शिकता येईल. परवेश वर्मा म्हणाले, “मी केजरीवाल यांना झंडेवाला (दिल्लीतील) आणि नागपूर येथील आरएसएस कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि राष्ट्रवादाबद्दल जाणून घेण्यासाठी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतो.”

“राष्ट्रवाद आपल्या हृदयात आणि मनात असला पाहिजे. तो (केजरीवाल) किती मोठा राष्ट्रवादी आहे हे आपल्याला माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि काश्मीर फाईल्सला विरोध करतात. त्यांच्या सरकारच्या काळात दिल्ली आणि पटियाला येथे झालेल्या दंगलींचे काय?”, असा प्रश्नही भाजप नेते परवेश साहिब सिंग वर्मा यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसशी बिनसल्यावर प्रशांत किशोर नवीन पक्ष स्थापण्याच्या तयारीत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आप १ जुलैपासून यूपीमध्ये १० हजार तिरंगा शाखा सुरू करणार आहे. येत्या ६ महिन्यांत या शाखा तयार होतील. यूपीचे प्रभारी आणि खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, पक्ष यूपीच्या सर्व प्रभागांमध्ये अध्यक्ष आणि महापौरपदासाठी जोरदारपणे निवडणूक लढवेल. संघटना मजबूत करण्यासाठी ३० घरांवर मोहल्ला प्रभारी बनवण्यात येणार आहे.