महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून उमेदवार आणि जागा वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यातील मित्र पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेसनेही तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

२००९ मध्ये बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. याच मतदारसंघातून काँग्रेसने आसिफ झकेरिया यांना उमेदवारी दिली आहे. आसिफ झकेरिया हे दोनवेळा मुंबई पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. तर, त्यांना भाजपाचे आशिष शेलार यांच्याविरोधात लढाई लढावी लागणार आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. तर आताही १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत कोणाला मिळाली संधी?

विधानसभा मतदारसंघउमेदवार
खामगावराणा दिलीप कुमार सानंदा
मेळघाट – एस.टीडॉ.हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली एस.टीमनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रसमाणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिणमोहनराव मारोतराव अंबाडे
देगलूर – एस.सीनिवृत्तीराव कोंडीबा कांबळे
मुखेडहणमंतराव वेंजकतराव पाटील बेटमोगरेकर
मालेगाव मध्यएजाज बेग अजिज बेग
चांदवडशिरीषकुमार वसंतराव कोतवाल
इकतपुरी – एस.टीलकीभाऊ भिका जाधव
भिवंडी पश्चिमदयानंद मोतीराम चोरघे
अंधेरी पश्चिमसचिन सावंत
वांद्रे पश्चिमआसिफ झकेरिया
तुळजापूरकुलदीप धिरज आप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तरराजेश भरत लाटकर
सांगलीपृथ्वीराज गुलाबराव पाटील</td>

महाविकास आघाडीचा ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला?

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.