News Flash

पुणे-मुंबईकरांनो, या तारखेला अनुभवा भारत-विंडिज सामन्याचा थरार

विंडिजचा भारत दौरा ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.

भारत आणि विंडिज यांच्यादरम्यान आगामी काळात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्याचील बैठकीनंतर आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

विंडिजचा भारत दौरा ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. या दौऱ्यादरम्यान २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी २७ आणि २९ ऑक्टोबरला होणारे एकदिवसीय सामने हे अनुक्रमे पुणे आणि मुंबईत होणार आहेत.

 

कसोटी
४ ते ८ ऑक्टोबर – राजकोट
१२ ते १६ ऑक्टोबर – हैदराबाद
एकदिवसीय
२१ ऑक्टोबर – गुवाहाटी
२४ ऑक्टोबर – इंदूर
२७ ऑक्टोबर – पुणे
२९ ऑक्टोबर – मुंबई
१ नोव्हेंबर – थिरुवनंथपुरम
टी२०
४ नोव्हेंबर; कोलकाता
६ नोव्हेंबर; लखनौ
११ नोव्हेंबर; चेन्नई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2018 5:55 pm

Web Title: bcci declared dates of india windies matches pune mumbai gets 1 match each
टॅग : Bcci,Team India,WICB
Next Stories
1 Asia Cup 2018 : पाकिस्तानच्या संघात १८ वर्षीय आफ्रिदीचा समावेश
2 ICCचे माजी अध्यक्ष आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी
3 जिद्दीला सलाम! वडिलांच्या निधनाचं दु:ख पचवत पिंकी बलहाराने मिळवलं रौप्य पदक
Just Now!
X