जैव सुरक्षित वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आपल्या खेळाडूंना तीन आठवड्यांचा ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामना १८ जूनपासून साऊथम्प्टनच्या एजेस बाऊल येथे भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सुमारे २० दिवस विश्रांती मिळणार आहे. यानंतर ते १४ जुलैला एकत्र येतील आणि नॉटिंगहॅममध्ये ४ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करतील.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले, “कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी  पत्रकार परिषदेत म्हटल्याप्रमाणे संघाला ब्रेक देण्यात येईल. टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान सहा आठवड्यांचे अंतर आहे, त्यामुळे आम्हाला खेळाडूंवरही लक्ष द्यावे लागेल. यूकेमध्ये असताना त्यांना ब्रेक मिळू शकेल. खेळाडू सुट्ट्यांवर जाऊ शकतात. मित्र आणि इतरांना भेटू शकतात. खेळाडूंना एकत्र वेळ घालवण्याची संधी देखील मिळू शकते. यातील बरेच खेळाडू यूकेला आले आहेत, या देशात त्यांचे मित्रही आहेत.”

हेही वाचा – ‘‘असं म्हणू नकोस, माझं मन…”, रवीचंद्रन अश्विननं घेतली मांजरेकरांची फिरकी!

दोन्ही संघ –

भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.

राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.