कोइम्बतूर : दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या पहिल्या दिवशी पश्चिम विभागाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यरसह त्यांच्या प्रमुख फलंदाजाना अपयश आले. दक्षिण विभागाने पहिल्या दिवशी पश्चिम विभागाला ८ बाद २५० धावसंख्येवर रोखले.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज हित पटेल ९६ आणि जयदेव उनाडकट ३९ धावांवर खेळत होता. दक्षिण विभागाकडून साई किशोरने ३ बळी मिळवले. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर पहिल्या तासाभराच्या खेळातच पश्चिम विभागाने रहाणे (८), अय्यर (३७), सर्फराज खान (३४), यशस्वी जैस्वाल (१), प्रियांक पांचाळ (७) हे प्रमुख फलंदाज एकामागून एक गमावले. त्यानंतर आर. साई किशोरच्या फिरकीने पश्चिम विभागाच्या अडचणी वाढवल्या.

संक्षिप्त धावफलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम विभाग (पहिला डाव) : ९० षटकांत ८ बाद २५० (हित पटेल खेळत आहे ९६, जयदेव उनाडकट खेळत आहे ३९; आर. साई किशोर ३/८०, बसिल थम्पी २/४२, सी. बी. स्टिफन २/३९)