भारताचे माजी लेगस्पिनर आणि भारत-न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत समालोचनाची जबाबदारी सांभाळणाऱया लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ”मलाा आयुष्यभर रंगामुळे भेदभावाला सामोरे जावे लागले”, असे शिवरामकृष्णन यांनी म्हटले. त्यांनी भारतासाठी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डातील वर्णद्वेषाच्या प्रकरणी त्यांनी आपला अनुभव सांगितला.

शिवरामकृष्णन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले, ”रंगामुळे मला आयुष्यभर भेदभाव आणि टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मला आता त्रास होत नाही. दुर्दैवीरित्या हे माझ्याच देशात घडत आहे.” यापूर्वी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिकने आपल्या देशातील अनेक माजी खेळाडूंवर असे आरोप केले आहेत.

याआधी तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदने २०१७ मध्ये सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला होता. मुकुंदने भारतासाठी ७ कसोटी सामने खेळले आहेत. ”मी वयाच्या १५व्या वर्षापासून देशात आणि देशाबाहेर फिरत आहे. मी लहान असल्यापासून माझ्या रंगाच्या लोकांची इतरांना समस्या राहिली आहे”, असे मुकुंदने म्हटले होते.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा ‘गंभीर’ अपघात; मुलासोबत बाईक चालवताना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकुंद म्हणाला, ”जो क्रिकेटला फॉलो करेल त्याला ते समजेल. मी दिवसभर उन्हात सराव करत आहे आणि खेळत आहे आणि मला कधीही टॅन झाल्याबद्दल पश्चात्ताप झाला नाही. मी चेन्नईचा आहे, जे देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे.” गेल्या वर्षी भारत आणि कर्नाटकचा माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेशनेही वांशिक भेदभावाच्या अनुभवाबद्दल सांगितले होते.