विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका कोहलीसोबत वृंदावनमध्ये गेला होता. गुरुवारी कोहलीने वृंदावन येथील प्रेमानंद गोविंद शरण आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले. कोहलीला ८ तारखेपर्यंत भारताच्या एकदिवसीय संघात सामील व्हायचे आहे, तर त्याची मुलगी वामिका कोहलीचा वाढदिवस ११ जानेवारीला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही नीम करौली बाबांना खूप मानतात. काही वेळापूर्वी तो उत्तराखंडमधील नीम करोली बाबाच्या आश्रमातही पोहोचला होता. वृंदावनमध्येही दोघेही आधी नीम करोली बाबाच्या आश्रमात पोहोचले. बुधवारी तेथून दोघांचे फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच गुरुवारी ते प्रेमानंद गोविंद शरणजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची मुलगी वामिका कोहली देखील फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसून आली.

विराट-अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल –

गुरुवारी विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत नीम करोली बाबाच्या आश्रमाला आणि समाधीला भेट दिली. त्यानंतर माँ आनंदमाईहीच्या आश्रमात देखील गेले. त्याचवेळी दुपारी चार वाजता वृंदावन येथील पवन हंस हे हेलिपॅडवरून खासगी हेलिकॉप्टरने दिल्लीला रवाना झाले. या जोडप्याच्या वृंदावन भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यामध्ये ते आपल्या मुलीसोबत हात जोडून बसले आहेत. विराट-अनुष्काची गोंडस मुलगी वामिकाला पाहून चाहत्यांचे मन आनंदित झाले आहे. मात्र, व्हिडिओमध्ये वामिकाचा चेहरा लपवण्यात आला आहे. पण वामिकाची गोंडस आणि खोडकर कृती व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा – IND vs SL 2nd T20: झेल घेतल्यानंतर राहुल त्रिपाठीच्या ‘या’ कृतीने सर्वांनाच टाकले गोंधळात; पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट आणि कर्णधार रोहित शर्मा दोघेही टी-२० मालिकेचा भाग नाहीत. ते दोघेही वनडे मलिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना ७ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर १० जानेवारीपासून भारताला श्रीलंकेविरुद्ध तेवढेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.