scorecardresearch

नैराश्यात तुमचे हृदय बंद पडले तर…? सुदृढ हृदय ठेवण्यासाठी स्वीकारा ‘या’ टिप्स !

नैराश्यता कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. औषधे, मानसोपचार केल्यामुळे हा आजार बरा होतो.

नैराश्यात तुमचे हृदय बंद पडले तर…? सुदृढ हृदय ठेवण्यासाठी स्वीकारा ‘या’ टिप्स !
रोजच्या जीवनशैलीत बदल करून, नैराश्यावर मात मिळवा. Pic Credit – संग्रहित छायाचित्र

धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नैराश्य किंवा उदासीनता हा आज बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. १० ते २५ टक्के लोक आज उदासीनतेने ग्रासलेले आहे. तणाव आणि आर्थिक परिस्थिती यामुळे मानसिक ताण वाढत आहे. नैराश्य आल्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. नैराश्य हे हृदयाशी संबंधित आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. निरोगी दिनचर्या असेल तर तणाव कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत मिळते. रोजच्या जीवनशैलीत बदल करून, नैराश्यावर कशी मात करता येईल, हे जाणून घेऊया.

  • ध्यान करणे
    ध्यान करणे, हे मानसिक व्यायाम करण्याचा उत्तम उपाय आहे. दीर्घ श्वसन अथवा मंत्रांचा पुनरुच्चार केल्याने विविध फायदे मिळू शकतात. ध्यान केल्याने तणाव दूर होतो आणि शरीर व मन रिलॅक्स होते. नैराश्यामुळे बऱ्याच वेळेस नीट झोप लागत नाही. अशा परिस्थितीत मन शांत व्हावे आणि चांगली झोप लागावी, यासाठी दीर्घ श्वसनाचा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. या सवयींचा अवलंब करून निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास नैराश्यता कमी होऊ शकते व निरोगी आयुष्य जगता येऊ शकते.
  • व्यायाम करणे
    व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, मनोरचनाही सुधाते. तसेच आत्मसन्मान वाढण्यासही मदत होते. व्यायाम केल्याने शरीरात नैसर्गिक ॲंटी-डिप्रेसंट्सचे उत्पादन वाढते. आठवड्यातून ३ ते ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम केल्याने नैराश्यता दूर करता येऊ शकतो.
  • सकस आहार
    जीवनशैलीत बदल केल्याने निरोगी व तंदुरुस्त मन आणि शरीर मिळू शकतं. यामुळे नैराश्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. सकस, पौष्टिक आहार शरीरासाठी चांगला असतो आणि त्यामुळे मूड सुधारण्यासही मदत होते. ओमेगा ३ एस आणि ओमेगा 6 एस सारखे हेल्दी फॅटी ॲसिड्स वाढवा. त्यासाठी मासे, सुकामेवा, नट्स , ताजी फळं, भाज्या आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येऊ शकतो.

Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या