फळ ही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण कोणतेही फळ खाताना त्याचा आपल्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेतले पाहिजे. या आधीच्या लेखात आपण द्राक्ष खाल्याने आपल्या आतड्यावर कसा परिणाम होतो हे पाहिले. द्राक्षांच्या सेवनामुळे आतड्यातील काही बॅक्टेरिया कमी होतात तर काही वाढतात असे एका संशोधनातून स्पष्ट झाले. दरम्यान द्रांक्षाच्या सेवनामामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते का? याबाबतअपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

द्राक्षांच्या सेवनाने संपूर्ण आरोग्य तसेच हृदयाचे आरोग्य कसे सुधारते?

द्राक्षे खाल्ल्याने संपूर्ण आरोग्याला हातभार लागतो आणि विविध यंत्रणांद्वारे हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते. आज आपण काही सोपे पर्याय जाणून घेणार आहोत ज्यामुळे द्राक्ष सेवनाने सकारात्मक परिणाम होऊ शकतात

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Gold Silver Price on 15 April 2024
Gold-Silver Price on 15 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना फुटला घाम, १० ग्रॅमचा दर ऐकून व्हाल थक्क
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

अँटिऑक्सिडंट अ‍ॅक्टिव्हिटी: द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामध्ये रेझवेराट्रोल, फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स सारख्या पॉलिफेनॉल असतात. हे अँटिऑक्सिडंट्स हानिकारक फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसह विविध जुनाट आजारांशी (chronic diseases) संबंधित आहे आणि द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स हा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकतात.

हेही वाचा – मध आणि खजूर करू शकतात का रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित? कृत्रिम साखरेसाठी पर्याय ठरू शकतात का?

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य: रेझवेराट्रोल, रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते, जळजळ कमी करू शकते आणि LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करू शकते, ज्याला ”खराब” कोलेस्ट्रॉल म्हणून संबोधले जाते. हे परिणाम हृदयरोग आणि हदयविकाराचा झटका यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

रक्तदाब: द्राक्षे आणि द्राक्षाच्या पदार्थांचे (जसे की द्राक्षाचा रस) नियमित सेवन केल्यास कमी रक्तदाब पातळीशी संबध दिसून येतो. काही संशोधनात असे दिसून आले कीकी द्राक्षातील पॉलिफेनॉल आणि इतर बायोएक्टिव्ह संयुगे रक्तवाहिन्यांना आराम देतात, रक्त प्रवाह सुधारण्यास आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात.

हृदय विकाराचा धोका कमी करतो: द्राक्षांनी संभाव्य हृदय-संरक्षणात्मक प्रभाव प्रदर्शित केले आहेत. संशोधनात असे दिसून आले की, द्राक्षांचे सेवन केल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी करण्यास, निरोगी रक्तप्रवाहाला चालना देण्यास आणि एंडोथेलियमचे (रक्तवाहिन्यांचे आतील अस्तर) कार्य सुधारण्यास मदत करू शकते. हे परिणाम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्यास चांगले योगदान देतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

हेही वाचा : नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कसे करू शकता सेवन…

दाहक-विरोधी गुणधर्म: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या विकासासाठी तीव्र दाह(Chronic inflammation) हे महत्त्वपूर्ण योगदान देते. द्राक्षांमध्ये पॉलीफेनॉलसह आढळणारे दाहक-विरोधी संयुगे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात, हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.

कोलेस्टेरॉल: काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की नियमित द्राक्षाच्या सेवनाने लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत होते, ज्यामध्ये एकूण कोलेस्टेरॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, तर एचडीएल (उच्च घनता लिपोप्रोटीन) कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्टेरॉलच्या पातळीवर हा अनुकूल परिणाम हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.