नुकतेच ५५ किलो वजन कमी करणाऱ्या राम कपूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामुळे नेटकऱ्यांचे त्याने लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, लेट्स टॉक विथ देवनाजी पॉडकास्टवर हजेरी लावत, त्याने वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान आलेल्या आव्हानाचा खुलासा केला आणि या संघर्षातून तो काय शिकला याबाबत सविस्तर चर्चाही केली. ‘बडे अच्छे लगते हैं’फेम अभिनेता राम कपूर म्हणाला, “पाच वर्षांमध्ये मी एकदा नव्हे, तर दोनदा वजन कमी करण्याचा मोठा प्रवास केला. माझे वजन दोनदा ३० किलो कमी झाले आणि ते पुन्हा वाढले. पाच वर्षांत काय करू नये हे मी शिकलो. मग मी खूप संशोधन सुरू केले, भरपूर वाचन केले आणि मी स्वतःला शिक्षित केले. मी रात्री जागून सर्व तज्ज्ञांची पुस्तके वाचायचो, मी पॉडकास्ट पाहायचो.”

वजन कमी करताना नेमके चुकले कुठे? राम कपूरचा खुलासा

राम कपूरने स्पष्ट केले की, मी एक तज्ज्ञ नाही; परंतु माझे वैयक्तिक मत आहे. मी हे शोधून काढले आहे की, या जगात दोन प्रकारचे लोक आहेत: जे लोक त्यांच्या फिटनेस आणि आरोग्याची खरोखर काळजी घेतात आणि दुसरे जे आरोग्याची काळजी घेत नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा दोनच प्रकारचे लोक असतात… जसे की खेळाडू किंवा अॅथलीट… निवृत्त झाल्यानंतरही ते नेहमीच तंदुरुस्त असतात. का? कारण या दोन व्यक्ती प्रत्येक बाबतीत पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांची विचारसरणी, प्राधान्यक्रम, जीवनशैली, आनंद, त्यांच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट माझ्यासारख्या लोकांपेक्षा वेगळी आहे.”

Ram Kapoor Body Transformation
राम कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली का? व्हिडीओ शेअर करीत स्वत: केला खुलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन
Ram Kapoor followed this eating pattern to lose 55 kg
Weight Loss: ५५ किलो वजन कमी करायला अभिनेत्याने वापरला ‘हा’ फंडा; फक्त टाळा ‘या’ चुका; वाचा डॉक्टर काय सांगतात
Bollywood actress Bandish Bandits star Shreya Chaudhary on gaining weight due to slip disc expert shared advice
अचानक वजन वाढल्यामुळे बॉलीवूड अभिनेत्रीला झाला ‘स्लिप डिस्क’चा त्रास; तज्ज्ञांनी सांगितला वजन कमी करण्याचा उपाय

वजन कमी करायचे असेल तर व्यक्ती म्हणून स्वत:ला बदला : राम कपूर

कपूर पुढे म्हणाला, “जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल, तर तुम्हालाही खेळाडूंसारखे वागले पाहिजे. राम कपूरने आहार उद्योगावर (diet industry) टीका केली की, ते अपयशासाठी डिझाइन केलेले आहे. तो म्हणाला, “संपूर्ण डाएटिंग उद्योग (diet industry) जो २० अब्ज डॉलर्सचा उद्योग आहे, तुम्ही वजन कमी करण्यात अयशस्वी व्हावे यासाठी तो डिझाइन केलेला आहे. कारण- तुम्ही त्यांच्याकडे परत जात नसाल, तर ते कसे अस्तित्वात कसे राहतील? ते तुम्हाला सांगतात की, आहारची पथ्य पाळून वजन कमी केल्यानंतर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून स्वत:मध्ये काही बदल करावे लागतील नाहीतर पुन्हा तुमचे वजन वाढू शकते. पण आहार उद्योगातील व्यक्ती तुम्हाला हे सर्व सांगत नाही.

व्यक्ती म्हणून स्वत:ला बदलू शकत नसाल तर वजन कमी करण्याची अपेक्षा करू नका : राम कपूर

राम कपूर यांनी वैयक्तिक परिवर्तनाच्या गरजेवर भर दिला आणि असे सुचवले, “चिरस्थायी (दीर्घकाळ टिकणारे) परिणाम साध्य करण्यासाठी संपूर्ण मानसिकता बदलणे आवश्यक आहे. जर तुम्हाला आयुष्यभर तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुम्ही एक व्यक्ती म्हणून बदलू शकत नसला, तर तुम्ही वजन कमी करण्याची अपेक्षा कशी करू शकता?”


आहार उद्योग (diet industry) झपाट्याने वाढत असल्याने बरेच लोक तात्पुरते परिणाम आणि निराशेच्या कधीही न संपणाऱ्या लूपमध्ये अडकलेले दिसतात. पण, चिरस्थायी (दीर्घकाळ टिकणारे) आरोग्य मिळविण्यासाठी राम कपूर यांनी मांडलेला दृष्टिकोन खरंच कार्य करतो का? याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे पाहू…

वजन कमी करण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवणे खरंच आवश्यक आहे का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मानसिक आणि वर्तणुकीत बदल होणे आवश्यक आहे. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, सार्वजनिक आरोग्य विचारवंत डॉ. जगदीश हिरेमठ सांगतात, “शाश्वत वजन कमी (Sustained weight loss) करणे हे आहार योजना आणि व्यायामाच्या नित्यक्रमांच्या पलीकडे आहे, ज्यासाठी मानसिक आणि वर्तणुकीतील बदल आवश्यक आहेत. त्यामध्ये अल्पकालीन उद्दिष्टाऐवजी फिटनेसला जीवनशैली म्हणून पाहण्याची मानसिकता बदलणे, सौंदर्याऐवजी आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारी आंतरिक प्रेरणा समाविष्ट आहे. निरोगी आहारमुळे व्यायाम आणि झोपेच्या दैनंदिन दिनचर्येद्वारे सुसंगतता निर्माण केल्याने वर्तणुकीच्या अभ्यासांद्वारे समर्थित असलेल्या चिरस्थायी (कायम टिकणाऱ्या) सवयींना प्रोत्साहन मिळते. तणावासारख्या ट्रिगर्स ओळखून भावनिक झाल्यानंतर खाणे टाळणे आणि माइंडफुलनेस किंवा व्यायाम यांसारख्या निरोगी पद्धतींचा अवलंब करणेदेखील आवश्यक आहे. अडथळे स्वीकारून आणि हळूहळू प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्यास निराशा आणि बर्नआउट टाळण्यास मदत होते.”

आहार उद्योग आणि अपयशाचे चक्र (Diet industry and a cycle of failure)

“डाएट इंडस्ट्री अवास्तव अपेक्षा आणि टिकाऊ पद्धतींचा प्रचार करून वारंवार ग्राहकांची दिशाभूल करतात; ज्यामुळे अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात अपयश येते,” असे डॉ. हिरेमठ म्हणतात. “क्रॅश डाएट आणि जास्त कॅलरीजचे सेवन टाळणे (extreme calorie restrictions) या बाबी जलद परिणामांचे आश्वासन देतात; परंतु ते वारंवार चयापचय क्रिया मंदावतात. त्यामुळे स्नायूंचे बल कमी होते आणि वजन पुन्हा वाढते. अभ्यास दर्शविते की, आहाराची ८०% पथ्ये पाळणाऱ्या लोकांचे वजन पुन्हा दोन वर्षांत वाढते.”

ते पुढे म्हणाले, “दिशाभूल करणारे मार्केटिंग वैज्ञानिक समर्थनाशिवाय ‘डिटॉक्स’ किंवा ‘फॅट बर्निंग’ यांसारखे बझवर्ड्स वापरतात. ECf शाश्वत वजन कमी करण्याच्या शिक्षणाच्या अभावामुळे ग्राहकांना मायक्रोन्यूट्रिएंट बॅलन्स आणि चयापचय अनुकूलन (Metabolic adaptation) यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची माहिती नसते. वारंवार अपयशामुळे आत्मविश्वास कमी होतो, ज्यामुळे व्यक्ती त्यांना विकल्या गेलेल्या सदोष पद्धतींऐवजी स्वतःला दोष देतात.”

वजन कमी करण्यासाठी दीर्घकालीन जीवनशैलीत बदल करण्यात शिक्षण आणि आत्म-जागरूकता यांची भूमिका आहे.

डॉ. हिरेमठ नमूद करतात, “शिक्षण आणि आत्म-जागरूकता व्यक्तींना त्यांच्या अद्वितीय गरजा व वजन कमी करण्यामागील विज्ञान समजून घेऊन, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करते. “पुरावा-आधारित संसाधने हे अचूक सल्ला आणि आहार उद्योगातील खोटेपणा ओळखण्यासाठी सक्षम करतात. तर, चयापचय अनुकूलतेचे ज्ञान जास्त कॅलरीज प्रतिबंधासारख्या चुका टाळण्यास मदत करते. वैयक्तिक ट्रिगर्स आणि सवयींबद्दलची आत्म-जागरूकता एखाद्याच्या जीवनशैलीशी सुसंगत योग्य धोरणांचा अवलंब करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त फूड व्लॉग्स आणि फिटनेस ट्रॅकर्ससारखी साधने वस्तुनिष्ठ अभिप्राय (फीडबॅक) देतात, जबाबदारीला प्रोत्साहन देतात आणि माहितीपूर्ण अॅडजस्टमेंट करणे सुलभ करतात.”

Story img Loader