scorecardresearch

Premium

राहुल यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नेते सरसावले

‘जनमत चाचण्यां’मधून काँग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.

‘जनमत चाचण्यां’मधून काँग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला अपयश आले, असे सांगत कमलनाथ, जयराम रमेश आणि सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेते पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्यावर फुटू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. राहुल हे आमचे नेते होते आणि या निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरीही तेच आमचे नेते राहतील. नव्हे, आघाडीवर राहून ते आम्हाला दिशा दाखवतील, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपला पाठिंबा दिला.

हे कार्यकर्त्यांचे अपयश
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशभर प्रचार दौरे केले, मात्र त्या दौऱ्यांचे विजयश्रीत रूपांतर करणे ही पक्ष संघटनेची-कार्यकर्त्यांची जबाबदारी असते. पराभव झाल्यास, गांधी कुटुंबीयांना नव्हे तर पक्ष संघटनेस जबाबदार धरावे लागेल, असा अभिप्राय केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी दिला.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leaders become active to save rahul gandhi from defeat responsibility

First published on: 14-05-2014 at 02:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×