२६/११ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पुन्हा मुंबईत अशाच प्रकारचा हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर मिळालेल्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे. “अशा प्रकरच्या धमक्यांना गांभीर्याने घेतले पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, उगीच आलं यांच्या मनात आणि…”; अजित पवारांचा ‘त्या’ घोषणेवर आक्षेप!

धमकीला गांभीर्याने घेण्याची गरज

अनेकदा अशा धमक्या येतात. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर कळाले की, काही माथेफीरू, विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. मुंबईला पुन्हा मिळालेली दहशतवाद्यांची धमकी गांभीर्याने घेतली पाहीजे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्रानेसुद्धा यामध्ये लक्ष दिले पाहिजे. सरकार ही धमकी गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा करुया, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- “हल्ला झाला त्याच ठिकाणी सभा घेणार, दम असेल तर…”, उदय सांमतांचा हल्लेखोरांना इशारा

मुंबईत पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


“मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. यासंदर्भातला तपास सुरू आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसातील सूत्रांनी दिल्याचं ट्वीट एएनआयनं केलं आहे.