सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामुळे पाच लाखांची गुटखा तस्करी म्हैसाळ येथे उघडकीस आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कर्नाटक सीमेलगत असलेल्या रस्त्यावर ९ तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. यांपैकी कागवाड रस्त्यावरील म्हैसाळ तपासणी नाका महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी २४ तास पोलीसांचा सक्त पहारा असून येणार्‍या सर्व वाहनांची कडकपणे तपासणी केली जात आहे.

हेही वाचा : सागर बंगल्यावर धाराशिवच्या उमेदवारीसाठी रांग, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तोडगा काढण्याचे आव्हान

Tuljabhavani temple, Crowd,
उन्हाळी सुट्ट्या अन् निवडणूकही संपली, कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांची गर्दी
nashik lok sabha marathi newsnashik lok sabha marathi news
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक जिल्ह्यात महायुतीत धुसफूस कायम
highest voting percentage recorded in Kolhapur
मतदानानंतर कोल्हापुरात आकडेमोड सुरू; टक्केवारीत वाढ, लाखाच्या विजयाचे दावे
Naresh Mhaske, Clash, two groups,
नरेश म्हस्केच्या मिरवणुकीत दोन गटात हाणामारी
upset ganesh naik supporters quit bjp
ठाणे मतदारसंघात भाजपमध्ये नाराजीनाट्य ; नवी मुंबई, भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे
BLO alleges that BJP MLAs office bearers are making rounds in the polling stations
भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मतदान केंद्रात येरझारा; बीएलओचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
42 gangster tadipaar from pune city
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार
amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला

तपासणी करत असताना गुरूवारी दुपारी वाहनाची (एमएच १० एक्यू ५३८४) याची झडती घेतली असता बंदी असलेल्या गुटख्याची पोती आढळली. वाहनात पोत्यात भरलेली विमल मसाला, विमल तंबाखू, विमल किंग तंबाखू व किंग तंबाखू असा सुमारे पाच लाखाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुटख्यासह वाहन जप्त केले असून अकबर शेख (वय ४५ रा. शंभर फुटी रोड, पाकिजा मस्जिदजवळ सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.