Marathi News Today: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. हल्ल्यानंतर विरोधकांनी एकमताने केंद्र सरकारला पाठिंबा दिला असला तरी काही नेत्यांनी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने पंतप्रधान बेपत्ता असल्याची पोस्ट केली. त्यानंतर ती पोस्ट डिलीट केली. तसेच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांनी सरकारसमोर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Live Updates

Mumbai-Pune News Today 30 April 2025 | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स ३० एप्रिल २०२५

20:05 (IST) 30 Apr 2025

सोलापुरात आसरा रेल्वे उड्डाणपुलाचे पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन..

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ३ जून २०२३ रोजी त्याचे भूमिपूजनही केले होते. परंतु नंतर गेल्या दोन वर्षात या कामाची एकसुध्दा वीट हलली नाही. ...सविस्तर बातमी
19:43 (IST) 30 Apr 2025

मृतात्म्यामुळे कुटुंबाला आजारपण;संशयावरुन शेजाऱ्यांशी वाद,अंनिसच्या प्रबोधनाने सलोखा

हा वाद अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन व सामोपचाराने मिटवला. आता दोन्ही कुटुंबातील कटुता संपली आणि संवादही सुरू झाला. ...वाचा सविस्तर
19:20 (IST) 30 Apr 2025

राज्यात खंडणीखोरांना राजाश्रय - पृथ्वीराज चव्हाण

राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरा विरूध्द कक्ष स्थापन करून याला पायबंद घातला पाहिजे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केले. ...सविस्तर बातमी
18:54 (IST) 30 Apr 2025

जिल्हा प्रशासन गतिमान होण्यासाठी सोलापुरात प्रथमच 'एआय'चा प्रयोग

यात सार्वजनिक वितरण प्रणालीसह शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या पाच विभागांचा प्राथमिक स्तरावर समावेश करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:30 (IST) 30 Apr 2025

जिल्ह्यातील खेळाडू घडवण्यासाठी विशेष लक्ष देणार - डॉ. इंदूराणी जाखड

आदिवासी भागातील खेळाडूंसाठी आश्रम शाळेत विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था व्हावी तसेच खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या दृष्टीने वेगवेगळ्या योजना तयार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ...सविस्तर बातमी
18:08 (IST) 30 Apr 2025

पाण्याच्या शोधात हरीण नागरी वस्तीत; वनविभाग व अग्निशमनदलाकडून जखमी हरणाची सुखरूप सुटका

एका जखमी हरणाची वनविभाग व मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार कसरून त्या हरणाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
17:38 (IST) 30 Apr 2025

"जातनिहाय जनगणना नसल्यामुळं अनुसूचित जाती-जमाती वगळता इतरांच्या...", अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

जातीनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, "देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं जातनिहाय जनगणनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शहा जी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार!"

केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून यामुळं सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी प्रदान करता येईल. त्यामुळं मागास समाजघटकांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं ध्येय अधिक वेगानं साध्य करता येईल.

जातनिहाय जनगणना करण्याची अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटना गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने मागणी करीत आहेत. ही मागणी प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री मा. श्री. अमित शहा यांच्या दूरदृष्टीपूर्ण व संवेदनशील नेतृत्वामुळं पूर्णत्वास जाऊ शकली. जातनिहाय जनगणना नसल्यामुळं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक व सामाजिक स्थितीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळं याचा परिणाम ओबीसी समाजासह अन्य इतर समाजघटकांनाही भोगावा लागत होता.

प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणारा ठरेल तसंच भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास आहे.

17:35 (IST) 30 Apr 2025

ठाणे पोलिसांकडून उत्तर प्रदेशातील अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त, कपड्याच्या दुकानात सुरू होता कारखाना

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी या अमली पदार्थाचा कारखाना उद्धवस्त केला. ...सविस्तर बातमी
17:05 (IST) 30 Apr 2025

महाराष्ट्र दिनी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ;ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. ...सविस्तर वाचा
16:10 (IST) 30 Apr 2025

रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर; जागतिकस्तरीय आठ नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध

या संशोधनामुळे डॉ. प्रतिक नाटेकर यांनी ‘मायकोलॉजी ऑफ ब्लॅक मिल्डूज’ या क्षेत्रात एक महत्वपूर्ण स्थान मिळवले असून त्यांच्या या संशोधनामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर आली आहे. ...सविस्तर वाचा
15:10 (IST) 30 Apr 2025

डोंबिवली पलावा सिटी परिसरात हरे कृष्ण मंदिराची उभारणी; मंदिर परिसर सामाजिक, अध्यात्मिक, श्रध्दा केंद्र बनविण्याचा ट्रस्टचा निर्धार

हरे कृष्ण मंदिर मुंबई, नवी मुंबईत आहेत. ठाणे ते कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरात अशाप्रकारचे मंदिर नसल्याने भक्तांना नवी मुंबई, मुंबईत जावे लागत होते. ...वाचा सविस्तर
14:52 (IST) 30 Apr 2025

डोंबिवलीत महाविद्यालयीन तरुणीची इमारतीमधून उडी मारून आत्महत्या

समीक्षा नारायण वड्डी (२०) असे मरण पावलेल्या तरूणीचे नाव आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. ...वाचा सविस्तर
14:51 (IST) 30 Apr 2025

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी,चिंचोटी ते वसई फाट्यादरम्यान वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटरच्या रांगा ; प्रवाशांचे हाल

बुधवारी सकाळपासूनच चिंचोटी पासून वसई फाट्या दरम्यान वाहनांच्या लांबलांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. ...सविस्तर बातमी
14:50 (IST) 30 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘चलो मुंबई’ आंदोलन; २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (३० एप्रिल) पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची हाक दिली असून सरकारविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यावेळी ते पुन्हा एकदा मुंबईत येणार असून २९ ऑगस्ट पासून मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी राज्य सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून २८ तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २९ तारखेपासून उपोषण करू. तसेच यावेळी एकतर विजयाचा रथ आणू किंवा अंत्ययात्रेचा, असा निर्धारही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

14:44 (IST) 30 Apr 2025

कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात भिवंडीतील न्यायबंद्याची पोलिसाला ठोशाबुक्क्यांनी मारहाण

सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा (२९) असे न्यायबंदीचे नाव आहे. सुरज सिंग हा भिवंडी जवळील सोनाळे गावातील प्रकाश मढवी चाळीत राहणारा इसम आहे. ...अधिक वाचा
14:27 (IST) 30 Apr 2025

मेपासून मुंबई - बिहार अमृत भारत एक्स्प्रेस सेवेत…

या नव्या धाटणीच्या एक्स्प्रेसमुळे उत्तर भारतीय प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे. ...सविस्तर वाचा
14:12 (IST) 30 Apr 2025

पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण; नवीन वाहनांमुळे सेवा देणे होणार जलद

अग्निशमन विभागाच्या गेल्या अनेक वर्षाची मागणी काही प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी सेवा देणे सोपे होणार आहे. ...अधिक वाचा
14:03 (IST) 30 Apr 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री निर्णय घेतील त्यास आमचा पाठिंबा; ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले स्पष्ट

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. ...सविस्तर बातमी
13:41 (IST) 30 Apr 2025

तटकरेंविरोधात रायगडमधील शिवसेना आमदार का आक्रमक झाले?

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षसंघटना बांधणीला सुरूवात केली आहे. ...अधिक वाचा
13:19 (IST) 30 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर…”, शरद पवारांचे विधान

ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरातील पूजेनिमित्त शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित राहिल्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे.

12:23 (IST) 30 Apr 2025

डोंबिवलीत भागशाळा मैदानात दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांचे स्मृतिस्थळ?

दहशतवादी हल्ल्यातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी भागशाळा मैदानात एक स्मृतिस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी डोंबिवलीचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. ...अधिक वाचा
12:05 (IST) 30 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: मुंबईला मिळाले नवे पोलीस आयुक्त; फणसळकर निवृत्त होताच देवेन भारतींना मिळाला पदभार

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. गृह विभागाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

11:08 (IST) 30 Apr 2025

नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर वसई सातीवली येथील प्रकार ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सातीवली मौर्या नाका जवळ नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे आतील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...वाचा सविस्तर
11:07 (IST) 30 Apr 2025
Maharashtra News LIVE Updates: पहलगाम हल्ल्यानंतर २४ तासांत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता - संजय राऊत

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याला पहिल्या २४ तासांत उत्तर द्यायला हवे होते. जगभरात याचप्रकारे बदला घेतला जातो. एक सैनिक जरी मारला गेला तर अमेरिका, रशिया आणि इस्रायलसारखी राष्ट्र ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केल्याचे सांगितले गेले. पण पाणी असे बंद होत नाही. त्यासाठी साठवणूक क्षमता करावी लागेल. बंधारे बांधावे लागतील. यासाठी २० वर्ष लागतील. पण आपण पाकिस्तानच्या २७ युट्यूब चॅनेलवर बंदी घातली. याला बदला म्हणतात का? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

https://www.youtube.com/watch?v=19EsNlWjkQ4

Congress on Pahalgam Terror Attack

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसची भूमिका काय? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)