Mumbai Maharashtra News Today : राज्यात दोन नवी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातीलही दरी मिटण्याची शक्यता आहे. ही दोन्ही समीकरणं जुळून आल्यास राज्यातील राजकारणात कदाचित वेगळे वारे वाहू लागतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हा खटाटोप सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभेत सपाटून मार खालल्यानंतर या चारही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे आज महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई हे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीसपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असतील. तसंच, वसई विरारमध्ये ईडीने छापेमारी केली असून ४१ बेकायदेशीर इमारतप्रकरणात धडक कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यासह राज्यातील विविध अपडेट्स जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today 14 May 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

20:10 (IST) 14 May 2025

Devendra Fadnavis : "भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने दाखवलं", मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सैन्यांचं कौतुक

तिरंगा रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना भारतीय जवानांचं कौतुक करत ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केलं. ...सविस्तर वाचा
19:04 (IST) 14 May 2025

गुटख्याची विक्री करणारे दोघेजण अटकेत

वागळे युनिटच्या पथकाने सापळा रचून वाहनासह गुटखा विक्रीसाठी आलेल्या आयुष छोटेलाल निगम (२२) आणि शिवम सिताराम निगम (२२) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला १ लाख ४१ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ...अधिक वाचा
17:14 (IST) 14 May 2025

महापालिका शाळेची गोधडी आता परदेशात, विद्यार्थिनींना शिक्षिकेची साथ

नाशिक महापालिकेची आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ ही वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. या शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी सुट्टींमधील उपक्रम म्हणून विद्यार्थिनींना गोधडी तयार करण्यास सांगितले आहे. ...सविस्तर बातमी
16:38 (IST) 14 May 2025

"नाक घासून माफी मागा, मगच विलिनीकरणाची चर्चा करा", अजित पवार गटाच्या नेत्यांनी ठेवल्या अटी-शर्थी

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी अजित पवारांवर विखारी टीका केल्या आहेत, त्यांनी नाक घासून माफी मागावी, मगच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित दादांनी निर्णय घ्यावा. दादा जो निर्णय घेतील ते आम्ही सर्व मान्य करू. टोकाची भाषणं कोणी केली. उत्तमराव जाणकर, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, काही जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांवर टीका टिप्पणी केली. त्यांनी माफी मागून पापक्षालन करावं. आम्हीही टीका केली, पण आमच्या टीकेचा एक स्तर होता. आमच्याकडूनही जहाल टीका झाल्या असतील तर आम्ही माफी मागायला तयार आहोत - अमोल मिटकरी</p>

16:28 (IST) 14 May 2025

नव्या उड्डाण पुलामुळे घोडबंदरचा प्रवास वेगवान; भाईंदर पाडा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला

या नागरिकांना महामार्गावरून रस्ता ओलांडता यावा आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी या मार्गावर यापुर्वीच उड्डाणपुल उभारण्यात आलेले आहेत. ...अधिक वाचा
16:26 (IST) 14 May 2025

जलमय, खड्डेमय स्थितीला प्रशासकासह सरकार जबाबदार - महापालिकांच्या कारभारावर संजय राऊत यांचे टिकास्त्र

सैतानाच्या हाती असणारी लोकप्रतिनिधींची सभागृहे लोकांच्या हाती द्यावीत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी मतदान यंत्रांची तयारी झाल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना काढली जाईल, असा टोला राऊत यांनी हानला. ...अधिक वाचा
16:03 (IST) 14 May 2025

राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, "भाजपात जाण्याबाबत..."

Tejaswi Ghosalkar Resignation : तेजस्वी घोसाळकरांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ...अधिक वाचा
15:35 (IST) 14 May 2025

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे एमआयडीसी समोर आव्हान.

तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर नवापूर या मुख्य रस्त्यावरील मधुर चौक ते टाकी नाका व  हिरो शोरूम पर्यंतच्या दोन्ही मार्गिकांचे काँक्रीटीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
15:34 (IST) 14 May 2025

पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का

या पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात यावी, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. ...सविस्तर बातमी
13:05 (IST) 14 May 2025

नागपूरमध्ये भाजपचा हिंदी भाषिकांच्या मतांवर डोळा

जगातील सर्वात मोठा पक्ष लोकशाही प्रक्रियेव्दारे अध्यक्ष निवडतो, असे दावे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नागपूर शहर अध्यक्षपदासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडलेल्या तीन नावापैकी एकाही नावाला पसंती न देता माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या रुपात तिसरेच नाव जाहीर केले. ...सविस्तर वाचा
13:05 (IST) 14 May 2025

संजय राऊतांनी नारायण राणे आणि राज ठाकरेंचं जाहीररित्या केलं कौतुक; म्हणाले...

मी नेहमी दोन लोकांचं कौतुक करतो. राज ठाकरे आणि नारायण राणे. नारायण राणेंनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण ही शिवसेना माझी आणि मी या पक्षाचा असा दावा त्यांनी केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमलं नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि राजकारण सुरू ठेवलं. राज ठाकरेंनी दुसरा पक्ष स्थापन केला. तेव्हा आमचे मतभेद झाले. एकनाथ शिंदेंप्रमाणे त्यांनी पक्षावर दावा केला नाही - संजय राऊत</p>

13:05 (IST) 14 May 2025

राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ...सविस्तर बातमी
13:05 (IST) 14 May 2025

कृष्णा मराठवाड्याचे पाणी डिसेंबरपर्यंत, भोयर येथील पंप पूर्णत्वाकडे

मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोरे प्रकल्पातील २.२४ अब्ज घनफूट पाणी ऑगस्टमध्ये घाटणे उच्च पातळी बंधार्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...वाचा सविस्तर
13:04 (IST) 14 May 2025

जालना: पैशाच्या वादामधून लहान भावासह पुतण्याचा खून

लग्नासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या मुलाचा चाकूने वार करून खून करण्याची घटना जिल्हयातील बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी घडली आहे . ...वाचा सविस्तर
12:55 (IST) 14 May 2025

मुंबईत मेट्रोचं जाळं वाढवणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काशीगाव ते दहीसर या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक चाचणी होत आहे. ती झाल्यावर प्रवाशांसाठी हा टप्पा सुरु केला जाईल. पश्चिम द्रुतगती महामार्गाला पर्याय म्हणून मेट्रो हा चांगला पर्याय आहे. नेताजी सुभाषचंद्र मैदान ते अगदी बांद्र्यापर्यंत आपल्यालाला कनेक्टिव्हिटी करायची आहे. विविध टप्प्यांमध्ये त्याचं काम चाललं आहे. असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

12:51 (IST) 14 May 2025

दहिसर ते काशिगाव मेट्रो ९ मार्गाची आज चाचणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर

https://twitter.com/ANI/status/1922552311638876243

12:45 (IST) 14 May 2025

तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

12:36 (IST) 14 May 2025

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच एकनाथ खडसेंचं मोठं विधान; म्हणाले, "अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाच..."

येत्या काळात शरद पवारांच्या पक्षातील एक गट अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...अधिक वाचा
11:19 (IST) 14 May 2025

डोंबिवलीतील शिक्षिकेला मोबाईलवर अश्लिल लघुसंदेश पाठवून छळवणूक, छळ करणाऱ्या इसमावर चोरीचा आरोप

या इसमाचा सततचा त्रास वाढू लागल्याने अखेर त्रस्त झालेल्या शिक्षिकेने कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ...सविस्तर बातमी
11:07 (IST) 14 May 2025

भूषण गवईंकडून शस्त्रसंधी होणार नाही - संजय राऊत

डी. वाय. चंद्रचूडही महाराष्ट्राचे होते. चंद्रचूड आणि गवई यांच्यात फार मोठा फरक आहे. चंद्रचूड यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यांनी न्याय केला नाही. भूषण गवई यांच्याविषयी बरंच ऐकतोय, सामान्य घरातून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले. कालच त्यांची एक मुलाखत ऐकली एक मराठी माणूस म्हणून मन भरून आलं. त्यांनी परखडपणे सांगितलं की मी इथे विकत जायला बसलेलो नाही. मी सुद्धी निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही. अशा माणसाला कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्याला मोदीच काय डोनाल्ड ट्रम्पही विकत घेऊ शकत नाही. शस्त्रसंधी भूषण गवईंकडून होणार नाही - संजय राऊत</p>

11:02 (IST) 14 May 2025

"राज ठाकरे मुक्त विद्यापीठ, त्यामुळे चर्चा करत राहू", पालिका निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीसांचं विधान

राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळीही केली. कॉर्पोरेशनपूर्वीही करू. या चर्चेतून काय निघेल हे आज सांगता येत नाही. कारण राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यामुळे त्यांची स्वतःची काही स्टॅट्युट आहेत. त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल हे सांगता येत नाही - देवेंद्र फडणवीस</p>

त्यांना ज्यावेळी ज्यांच्यासोबत जायचं असतं ते त्यांच्यासोबत जातात. लोकसभेवेळी ते आमच्याबरोबर होते. पण विधानसभेवेळी ते आमच्याबरोबर होते की नव्हते हे त्यांना आणि आम्हालाच माहिती आहे - देवेंद्र फडणवीस

10:44 (IST) 14 May 2025

शहरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद; पालिकेच्यावतीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महापालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा आज, बुधवार, (१४ मे) रोजी, दुपारी १२ वाजेपासून ते गुरुवार,(१५ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत बंद असणार आहे. ...अधिक वाचा
10:36 (IST) 14 May 2025

महाराष्ट्राचे सुपूत्र भुषण गवई यांनी घेतली ५२ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

https://twitter.com/PTI_News/status/1922514857040957555

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Breaking News Live Today 14 May 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या