Raju Shetti on Shaktipeeth Expressway : माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सातत्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. हा महामार्गा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून गेल्यास येथील ऊसाचं, शेतकऱ्यांचं, साखर कारखानदारांचं प्रचंड नुकसान होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मंगळवारी (१ जुलै) रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ जारी करून दोन्ही जिल्ह्यांमधील जनतेला, साखर कारखानदारांना, लोकप्रतिनिधींना आवाहन केलं आहे की त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे की “सध्याचा नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना नव्या महामार्गाचा घाट का घालताय? ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यासाठीच हा अट्टाहास आहे का? नवा महामार्गा बांधण्याऐवजी सध्याच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचं विस्तारीकरण का करत नाही?” शेट्टी यांनी दोन नकाशे देखील सादर केले आहेत. या नकाशांमध्ये सध्याचा नागपूर-रत्नागिरी महामार्ग व त्याला समांतर व होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग देखील दाखवण्यात आला आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्रातील जनतेवर ८६ हजार कोटी रुपयांचा बोजा टाकणारा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर या महामार्गास समांतर आहे. या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर दोन किलोमीटर व जास्तीत जास्त अंतर ३० किलोमीटर इतकं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत. हे या नकाशावरून दिसून येईल. भविष्यात गरज पडल्यास सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरी ऐवजी सहा किंवा आठ पदरी करणे सहज शक्य असताना आता शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू शेट्टींकडून आंदोलनाची हाक

‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष म्हणाले, “कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी, विशेषतः साखर कारखानदारांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. उद्या, १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुणे -बंगळुरू महामार्ग पंचगंगा पूल, शिरोली या ठिकाणी सर्वजण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे